मराठमोळ्या पदार्थानी आज सगळ्यांना वेड लावलं आहे. रितेश देशमुखची पत्नी जिनिलिया देशमुखलादेखील पिठलं भाकरी आवडते. तिच्याप्रमाणेच इतर बॉलिवूडच्या कलाकरांना मराठी पदार्थ आवडतात. स्त्री चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर अस्सल महाराष्ट्रीय आहे. तिची आई मराठी असून वडील पंजाबी आहेत, मात्र घरात ती अस्खलित मराठीत बोलते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे.
नाशिक, ठाणे, पुणे कुठची मिसळ सर्वात उत्तम असा एका सध्या वाद सुरु झाला आहे. अभिषेक बच्चनला देखील ठाण्याच्या मामलेदार मिसळ आवडते. श्रद्धा कपूरनेदेखील मिसळ पावचा आनंद लुटत फोटो शेअर केला आहे, ज्यात ती मिसळ पाव खात आहे, wow मिसळ पाव असा कॅप्शन दिल आहे. श्रद्धा कपूर मराठी सण साजरे करत असते, तसेच अनेकदा पत्रकार परिषदेत मराठीत संवाद साधत असते.
-
misal pav
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
श्रद्धा कपूर ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते. श्रद्धा कपूरची झलक नुकत्याच ‘भेडिया’ चित्रपटातील ‘ठुमकेश्वरी’ या गाण्यात दिसली होती. लवकरच ती आता लव रंजन यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. तिच्याबरोबर या चित्रपटात रणबीर कपूरदेखील असणार आहे.