बॉलिवूडच्या जोड्या प्रसिद्ध आहेत त्यातील एक मराठमोळी जोडी खूपच प्रसिद्ध आहे ती म्हणजे रितेश, जेनेलिया देशमुख. १० वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी २०१२ साली लग्न केले. त्या दोघांना दोन मुलं आहेत. रितेश, जेनेलिया सोशल मीडियावर सक्रिय असतात. दोघांचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. सोशल मीडियावर ते फोटो, व्हिडिओ टाकत असतात आणि चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच दोघांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जेनेलिया रितेशला म्हणते ‘ऐका ना मला डॉक्टरांनी १ महिना आराम करण्यासाठी स्विझर्लंड, पॅरिस, अमेरिका, लंडन इत्यादी ठिकाणी जाण्यास सांगितले आहे, तुम्ही मला कुठे नेणार आहात’? यावर रितेश हताश होऊन म्हणतो ‘दुसऱ्या डॉक्टरांकडे’, त्यांच्या या व्हिडिओला नेटकरी आणि चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. फक्त चाहते नव्हे तर गजराज रावसारख्या अभिनेत्यांनीदेखील या व्हिडिओवर कॉमेंट केली आहे.
जेनेलियाने सुरवातीला जाहिरातीत काम केले आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. जेनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. ‘लई भारी’ चित्रपटात पहिल्यांदा ही जोडी मराठीमध्ये दिसली. मात्र ‘वेड’ या मराठी चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख हा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर आता रितेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.