अभिनेता शाहरुख खानची दोन्ही मुलं सुहाना आणि आर्यन यांनी अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. मात्र तरीही ते सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. या दोघांची नाव प्रसिद्ध स्टार किड्सच्या यादीत सामील आहेत. शाहरुखची मुलगी सुहान खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत चहत्यांना अपडेट करत असते. मात्र त्याचा मुलगा आर्यन खान सोशाल मीडियावर फरसा सक्रिय नसून आता त्याने तब्बल २ वर्षांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
आर्यन खान हा एक लोकप्रिय स्टार किड्समध्ये येतो ज्याच्या बॉलिवूड पदार्पणाची वाट चाहते आतुरतेने बघत आहेत. आर्यनची तुलना नेहमी त्याच्या वडिलांशी केली जाते. त्याचे दिसणेच नाही तर त्याच्या छोट्यात-छोटी सवय त्याच्या वाडिलां सारखी आहे. नुकताच आर्यनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट पाहून नेटकरी पूर्णपणे फिदा झाले आहेत. या पोस्टमधील त्याच्या लुक्सची चर्चा सोशल मीडियावर होता आहे. आर्यनने शेअर केलेला फोटो त्याच्या पदवीदान समारंभाच्या नंतर काढलेला आहे. त्याने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी विसरून गेलो होतो, पदवी मिळाल्या नंतरचा आवश्यक फोटो. उशिर झाला पण पोस्ट करतो आहे.”
View this post on Instagram
आर्यनने शेअर केलेल्या पोस्टवर लाखात लाईक्स मिळत आहेत. तसच शाहरुख खानची कार्बन कॉपी असल्याचे एका नेटकरीने कमेंटमध्ये लिहिले आहे. दरम्यान आर्यन बॉलिवूडमध्ये पदार्पण कधी करणार? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मात्र शाहरुख खानने एका मुलाखतीत हे स्पष्ट केलं आहे की, “आर्यनला अभिनयात काहीच रस नाही. त्याला लेखनाची आवड आहे. आणि त्याने एकदिवशी माझ्या जवळ येऊन मला सांगितले होते की त्याला नाही वाटत की तो अभिनय करु शकतो”.