‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली भूमी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचं नुकतच झालेलं फोटोशूट. भूमीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी केलेल्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सध्या अनेकांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
एखाद्या चित्रकाराने गडद रंगांचा वापर करत चित्र रेखाटावं त्याचप्रमाणे भूमीचे हे फोटो पाहायला मिळतात. यामध्ये काळ्या आणि सोनेरी रंगांचा जास्त प्रमाणात वापर केल्याचं लक्षात येतं. गडद रंग आणि त्यामध्ये खुलून आलेल्या भूमीच्या दिलखेचक अदा याविषयी काय आणि किती बोलावं हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. भूमीने पोस्ट केलेल्या या फोटोंसोबतच तिने क्रेडिट लाइनमध्ये छायाचित्रकार, फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्टचेही आभार मानले आहेत. आयुषमान खुरानासोबत ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या भूमीने स्वत:च्या शरीरावरही बरीच मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.
I don't have Monday blues! Nor am I seeing red! Simply trippin on this shoot with @WeddingTimesTOI! Thanks guys! pic.twitter.com/ulboyvWREd
— bhumi pednekar (@bhumipednekar) July 31, 2017
When hues come together! Thanks for the magical shoot @WeddingTimesTOI <1/2> pic.twitter.com/P651rDa2UZ
— bhumi pednekar (@psbhumi) July 31, 2017
वाचा : .. म्हणून शाहरुखच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना एकही पैसा मिळणार नाही
येत्या काही दिवसांमध्ये ती खिलाडी कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तेव्हा आता अक्षय आणि भूमीची केमिस्ट्री प्रेक्षकांची मनं जिंकणार का? हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीला सुरुवात झाली असून खिलाडी कुमार आणि भूमी प्रसिद्धीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. ग्रामीण भागांमध्ये शौचालयांचा अभाव आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या या साऱ्याभोवती ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’चं कथानक फिरणार आहे. श्री ही नारायण दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.