बॉलीवूडमध्ये सहा असे चित्रपट आले, ज्यांच्या नावात एक ठराविक शब्द होता. मुख्य म्हणजे हे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले होते. या चित्रपटांंमध्ये अमिताभ बच्चन, जितेंद्र, सनी देओल, अनिल कपूर असे स्टार्स होते, पण तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळले.

सहा चित्रपटांच्या नावात असलेला तो शब्द म्हणजे ‘कसम’. दोन चित्रपट ‘कसम’ नावाचे होते. तर दोन चित्रपटांची नावे ‘हिंदुस्तान की कसम’ होती. या सहापैकी एक चित्रपट असा होता, जो पहिल्यांदा रिलीज झाला तेव्हा फ्लॉप झाला. पण तो पुन्हा रिलीज झाल्यावर सुपरहिट ठरला होता.

हिंदुस्तान की कसम (१९९३)

देव आनंद यांचे भाऊ चेतन आनंद यांनी हिंदुस्तान की कसम हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा १९७१ मधील मधील भारत-पाक युद्धावर बेतलेला होता. या चित्रपटात राजकुमार, विजय आनंद आणि प्रिया राजवंश हे कलाकार होते. हिंदुस्तान की कसम हा चित्रपट फ्लॉप झाला होता.

हिंदुस्तान की कसम (१९९९)

हिंदुस्तान की कसम याच नावाचा चित्रपट १९९९ मध्ये आला होता. यात अमिताभ बच्चन आणि अजय देवगण होते. याचे दिग्दर्शन अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांनी केले होते. यात मनीषा कोईराला आणि सुष्मिता सेन होत्या. हा चित्रपटही चांगली कामगिरी करू शकला नव्हता.

तुम्हारी कसम (१९७८)

जितेंद्र आणि मौसमी चटर्जी यांचा तुम्हारा कसम देखील बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. या फिल्मचे दिग्दर्शन रवी चोप्रांनी केले होते. पण हा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला होता.

कसम (१९८८)

अनिल कपूर आणि पूनम ढिल्लन यांचा कसम चित्रपट १९९९ मध्ये आला होता. उमेश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता.

कसम (२००१)

२००१ मध्ये आलेल्या ‘कसम’मध्ये सनी देओल, नसीरुद्दीन शाह, चंकी पांडे, सोनू वालिया आणि नीलम हे कलाकार होते. पण दमदार स्टारकास्ट असूनही हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.

सनम तेरी कसम (२०१६– री-रिलीज २०२५)

हर्षवर्धन राणेचा ‘सनम तेरी कसम’ २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. १८ कोटींचे बजेट असून सिनेमाने फक्त ९ कोटींची कमाई केली होती. हा सिनेमा फ्लॉप झाला होता. मात्र २०२५ मध्ये री-रिलीज झाल्यावर या चित्रपटाने ५३ कोटींपेक्षा जास्त कमाई करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.