तब्बल चार वर्षानंतर बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान मोठ्या पडद्यावर झळकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘पठाण’ चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता चित्रपटाचे शोदेखील वाढवण्यात आले आहेत. चाहते चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी करत आहेत. याच चित्रपटाच्याबाबतीत ८३ चित्रपटाच्या दिग्दर्शक कबीर खानने केलेली भविष्यवाणी खरी ठरत आहे.
दिग्दर्शक कबीर खान बॉलिवूडमधील सध्याची अवस्था, दाक्षिणात्य चित्रपटांची चलती यावर काही दिवसांपूर्वी बॉलिवूड हंगामाला आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याला विचारण्यात आले की “आरआरआर अवतारसारखे चित्रपट हिट होत आहेत प्रेक्षकांची आवड निवड बदलली आहे का?” कबीर खान म्हणाला, “हे दोन चित्रपट चालणारच यात हॉलिवूड, बॉलिवूड, दाक्षिणात्य चित्रपट अशी तुलना कर नये. मला याचा आनंद होतो की एखादा चित्रपट जर चालला तर मला असे वाटते की लोकांना अजूनही चित्रपट बघण्यात रस आहे. मग तो चित्रपट कोणताही असो लवकरच ‘पठाण’ चित्रपट येत आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार हवा आहे मला असं वाटतंय हा चित्रपट जोरदार कमाई करणार मग लोक म्हणतील बॉलिवूड पुन्हा रुळावर आले मात्र त्यानंतर पुन्हा काही चित्रपट पडले तर पार्ट यावर उलट सुलट चर्चा होणार हे होतच राहणार कारण शेवटी हा एक उद्योग आहे.”
‘पठाण’ला बॉयकॉट करणाऱ्यांवर प्रकाश राज यांनी साधला निशाणा; ट्वीट करत म्हणाले…
‘पठाण’ आज जगभरात प्रदर्शित झाला, पण मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये काही गटांच्या विरोधानंतर चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले होते. पण, हे प्रकरण लवकर मिटवण्यात यश आलं असून काल दुपारनंतर त्याचे शो सुरू झाले. पहिल्याच दिवशी ‘पठाण’ला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी देशभरातील चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षक अक्षरशः मोठ्या संख्येने रांगा लावत होते.
चित्रपट सगळे बघणार पण…” शाहरुखच्या ‘पठाण’वर अनुराग कश्यपने केलं भाष्य
‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच चित्रपटात सलमान खानची झलक पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक आता चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत.