बॉलीवूड अभिनेता आमिर खान लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून झळकणार आहे. २० जूनला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आमिर खानची् ऑनस्क्रीन आई त्याला त्याची उंची कमी असल्याने टिंगू अशी हाक मारताना दिसते. आमिरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने याबाबत सांगितलं आहे.

‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आमिर खानने ‘जस्ट टु फिल्मी’शी संवाद साधला. यावेळी त्याने त्याला उंची कमी असल्याने भीती वाटायची याबाबत सांगितलं आहे. या मुलाखतीमध्ये त्याला त्याच्या उंचीवरून चित्रपटात करण्यात आलेल्या विनोदाबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेता म्हणाला, “एकदा जावेद अख्तर यांनी विनोद या विषयाबद्दल खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली होती आणि त्याबाबत मीही सहमत होतो. ते म्हणाले होते, विनोदबद्धी फक्त जोक्स, किंवा मज्जा करण्यापुरती मर्यादित नसते; तर जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीतून जात असता तेव्हा त्याचा तुम्हाला उपयोग व्हायला हवा आणि मला असं वाटतं की, माझी तेवढी कुवत आहे आणि हा चित्रपटाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा भाग आहे.”

आमिर खान पुढे त्याच्या उंचीबद्दल म्हणाला, “माझी उंची कमी आहे म्हणून नवीन असताना मला या गोष्टीची खूप भीती वाटायची. अमित जी, विनोद जी, शत्रुघ्न सिन्हा हे सगळे खूप उंच होते, त्यामुळे मला काळजी वाटायची. तेव्हा मला असं वाटायचं की, इथे कमी उंची असलेल्या अभिनेत्यांचं काही होईल की नाही?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सितारे जमीन पर’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये आमिर खान बास्केट बॉल कोचच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याला दिव्यांग मुलांना एका स्पर्धेसाठी तयार करण्याची शिक्षा मिळालेली असते. हा चित्रपट आर. एस. प्रसन्न यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ‘तारे जमीन पर’चा पुढचा भाग आहे. या चित्रपटात आमिरसह जिनिलीया देशमुख ही सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. येत्या २० जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.