बॉलीवूड अभिनेता आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणूनही ओळखला जातो. आमिर अभिनयाबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. साल २००५ मध्ये आमिरने किरण रावबरोबर लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नाच्या काही वर्षातच २०२१ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. आमिर व किरणच्या घटस्फोटाच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता लग्नाच्या तीन वर्षानंतर आमिरने घटस्फोटाबाबत भाष्य केले आहे.

नुकतेच आमिर एबीपीच्या आयडिया ऑफ इंडिया समिटमध्ये सहभागी झाला होता. या मुलाखतीत त्याने त्याच्या करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले. दरम्यान, आमिरने या मुलाखतीत त्याच्या व किरणच्या घटस्फोटाबाबतही भाष्य केले.

आमिर म्हणाला, “तुम्हा सर्वांना माहीत असेलच की, आमचा नुकताच घटस्फोट झाला आहे. एक दिवस मी संध्याकाळी बसलो होतो, तेव्हा मी किरणला म्हणालो की, नवरा म्हणून माझ्यात काय कमी होती? मी स्वतःमध्ये काय सुधारणा करू शकतो? आता मी आयुष्यात पुढे जात आहे. तर यावर नक्कीच विचार करेन.” आमिरच्या या प्रश्नावर किरणने त्याला लिस्टच वाचून दाखवली. “किरण मला म्हणाली की, लिहून घे. तू खूप बोलतोस. तू दुसऱ्या कोणालाच बोलून देत नाहीस. तुला नेहमी तुझंच खरं करायचं असतं.” आमिर म्हणाला, “त्यातील १५-२० मुद्दे मी लिहिले. सगळं बोलून झाल्यावर ती म्हणाली की, तू विचारलं म्हणून मी सांगितलं.”

आमिर खान व किरणची पहिली भेट लगान या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात आमिर प्रमुख भूमिकेत होता; तर किरण सहायक दिग्दर्शक होती. हळूहळू किरण व आमिरमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी ८ डिसेंबर २००५ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांना आझाद नावाचा मुलगा आहे. लग्नाच्या १५ वर्षांनंतर म्हणजे २०२१ मध्ये किरण आणि आमिरने घटस्फोटाची घोषणा केली होती.

हेही वाचा- “…तरच मी हॉलीवूडमध्ये करेन काम”; भूमी पेडणेकरने केली इच्छा व्यक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आमिर खान शेवटचा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या लाल सिंग चड्ढा चित्रपटात झळकला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर आमिर खानने अभिनयातून ब्रेक घेतला होता. आमिर अभिनयापासून लांब असला तरी तो निर्माता म्हणून सक्रिय आहे. सध्या राजकुमार संतोषी व सनी देओल यांच्याबरोबर आमिर ‘लाहोर १९४७’मध्ये काम करीत आहे. त्याशिवाय तो ‘तारे जमीन पर’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणातही व्यग्र आहे.