Aamir Khan Son Junaid Khan : बॉलीवूडमधील नेपोकिड्स हे कायमच चर्चेचा विषय ठरतात. सोशल मीडियावर या नेपोकिड्सचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडीओमधून नेपोकिड्सची लक्झरी लाइफस्टाईलही पाहायला मिळते. मात्र, बॉलीवूडमधील अनेक नेपोकिड्सपैकी आमिर खानचा मुलगा जुनैद खान याला अपवाद आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण- जुनैद खान हा त्याच्या अभिनयाबरोबरच साध्या राहणीमानासाठी ओळखला जातो.

आमिर खाननं ‘महाराजा’ या चित्रपटामधून बॉलीवूड विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं ‘लव्हयापा’ चित्रपटही केला. एक लोकप्रिय अभिनेता असण्याबरोबरच जुनैदची आमिर खानचा मुलगा, अशीही एक वेगळी ओळख आहे. पण, आमिर खानच्या नावाचं वलय जुनैद अजिबातच जाणवू देत नाही. जुनैद हा साधेपणातच राहणं पसंत करतो. त्यामुळे त्यानं अद्याप स्वत:ची गाडीही खरेदी केलेली नाही. त्याला स्वत:ची गाडी असणं आवडतही नाही.

जुनैद ठरवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतो, असं आमिरनं एका मुलाखतीत सांगितलं आहे. आमिरनं द न्यू इंडियनला दिलेल्या मुलाखतीत जुनैद त्याच्या स्वतःच्याच जगात राहतो आणि त्याला खासगी गाड्या किंवा विमान प्रवासापेक्षा सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करणं आवडत असल्याचं सांगितलं. तसेच आमिरनं मी जुनैदला त्यानं त्याची स्वत:ची कार घेण्यासाठी सांगून सांगून थकलो असल्याची प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त केली.

आमिरने सांगितलं मुलगा जुनैदच्या रिक्षा-बसने प्रवास करण्याचं कारण

त्याबद्दल आमिर असं म्हणाला, “जुनैदनं अजूनही स्वत:ची कार खरेदी केलेली नाही. तो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतो. मी त्याला स्वत:ची गाडी घे, असं सांगून सांगून थकलो आहे. त्यानं माझ्या काही गाड्यांपैकी एखादी घ्यावी, असंही मी त्याला सुचवलं. पण तो म्हणतो, ‘नाही बाबा, मला गाडीची गरज नाही’. एकदा तो केरळमध्ये होता आणि त्याला बंगळुरूमध्ये एका मित्राच्या लग्नाला जायचं होतं. तेव्हा मी त्याला विचारलं की, तो कोणत्या विमानानं जात आहे. त्यावर त्यानं राज्य परिवहनच्या बसनं जात असल्याचं सांगितलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे आमिरने सांगितलं, “जुनैदला अगदी सामान्य माणसासारखं आयुष्य जगणं पसंत आहे. त्याला भौतिक सुखात अजिबात रस नाही किंवा त्याला पैशांचीही फारशी पर्वा नाही.” दरम्यान, रिक्षानं गेल्यामुळे जुनैदला एक दिवशी यशराज स्टुडिओमध्येही प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याबद्दल जयदीप अहलावतनं एक किस्सा सांगितला. त्याबद्दल जयदीप म्हणाला होता, “जुनैद एकदा रिक्षानं आला होता. त्यामुळे त्याला आत घेत नव्हते. त्यानंतर तिथल्या सुरक्षा रक्षकांना जुनैदला सांगावं लागलं की, तो खरंच एक अभिनेता आहे.”