Ira Khan and Nupur Shikhare Wedding Reception: गेल्या काही दिवसांपासून आमिर खानच्या लेकीच्या लग्नसोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतीच आमिरची लेक आयरा नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकली. ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात ख्रिश्चन पद्धतीने दोघांचं लग्न झालं. त्यानंतर काल, १३ जानेवारीला आयरा-नुपूरच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी पार पडली. या पार्टीत राजकीय नेत्यांसह बॉलीवूडचे दिग्गज कलाकार मंडळी पाहायला मिळाले. पण आयराची सावत्र आई किरण राव दिसली नाही. यामागचं कारण आमिर खानने स्पष्ट केलं आहे.

काल आयरा खान-नुपूर शिखरेच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी जिओ वर्ल्ड सेंटरच्या बॉलरूममध्ये आयोजित करण्यात आली होती. या रिसेप्शन पार्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या पार्टीत बॉलीवूडच्या कलाकारांसह मराठी कलाकारांची देखील मांदियाळी पाहायला मिळाली. मात्र या सर्वांमध्ये किरण राव  गैरहजर होती. त्यामुळे आमिरने त्यामागचं कारण स्पष्ट केलं.

हेही वाचा – Video: आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शनला पत्नीसह पोहोचले राज ठाकरे, तर आदित्य ठाकरेंची आई व भावासह हजेरी

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर आमिर खानचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेता किरण राव गैरहजर राहण्यामागचं कारण सांगत आहे. आमिर म्हणतो, “आज किरणची तब्येत ठिक नाहीये. तर ही तिच्या चित्रपटाची टीम आहे. त्यामुळे मी तुम्हाला यांची ओळख करून देत आहे. ‘लापता लेडिज’ जो तिचा चित्रपट येतोय, त्यामधील हे कलाकार आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – Video: ‘जय श्री राम’! आयरा खान-नुपूर शिखरेच्या रिसेप्शनमध्ये कंगना रणौतचा नारा, व्हिडीओ चर्चेत

दरम्यान, आयरा खान-नुपूर शिखरेच्या लग्नाच्या ग्रँड रिसेप्शन पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. माहितीनुसार या रिसेप्शन पार्टीला २५०० पाहुण्यांना आमंत्रित केलं होतं.