बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीसह जुनैद पाहायला मिळणार आहे. गेल्या महिन्यात या चित्रपटाचं जपानमधील चित्रीकरण पूर्ण झालं होतं. यानिमित्ताने जोरदार पार्टी झाली होती; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. अशातच जुनैदच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओत जुनैद एका वेगळ्याच रुपात पाहायला मिळत आहे.

आमिर खानच्या लेकाचा हा व्हायरल व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. पृथ्वी थिएटर बाहेरील जुनैद खानचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत, डोळ्यात काजल लावलेला व कपाळावर काळा टिळा असलेला जुनैद पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी जुनैदला ओळखलंच नाही.

हेही वाचा – अदा शर्माच्या आवाजात स्वतःने गायलेलं भक्तीगीत ऐकून भारावला प्रथमेश लघाटे, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ केला शेअर

जेव्हा जुनैद थिएटर बाहेर आला तेव्हा पापाराझींनी त्याला पोज देण्यासाठी सांगितलं. त्यावेळेस जुनैदने पोज दिली आणि हसत म्हणाला, “भाई लोक मी अजूनही मेकअपमध्येच आहे.”

हेही वाचा – एका चाहतीला संकर्षण कऱ्हाडेशी करायचं होतं लग्न, पण…; अभिनेत्याने स्वतः सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “किती गोड…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुनैदच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हे काय आहे?”, “‘मेला’ चित्रपटातला गुंड”, “खूप साधा आणि शुद्ध मनाचा माणूस आहे”, अशा संमिश्र प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.