गेल्या चार-पाच दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत. दोघेही दोन दिवस मुंबईत एकत्र दिसले होते, त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या. परिणीतीने याबद्दल मौन बाळगलं असलं तरी राघव चड्ढांच्या काही वक्तव्यांमुळे या दोघांच्या नात्याच्या चर्चा लग्नापर्यंत येऊन ठेपल्या आहेत. परिणीती चोप्रा-खासदार राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार? दोन्ही कुटुंबियांची बोलणी सुरू ‘परिणीतीबद्दल नाही तर राजकारणाबद्दल विचारा’, असं म्हणत राघव चड्ढा लाजले आणि दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय. तुम्ही लग्न करणार आहात का? असा प्रश्न राघव चड्ढा यांना विचारण्यात आला, त्यावर त्यांनी हसत उत्तर दिलं. 'लग्न करू तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगू, मी काहीही लपवत नाहीये,' असं राघव चड्ढा म्हणाले. मॅनेजरने ऑफर लपवली अन् अमृता रावच्या हातून गेला सलमान खानचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट; अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली… तुम्ही आणि परिणीती चोप्रा एकत्र मुंबईत दिसला होतात, त्यानंतर तुमच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत, या चर्चा खऱ्या आहेत का? असा प्रश्न विचारला असता चड्ढा म्हणाले, 'तुम्ही मला राजनितीबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल नाही. तसेच लग्न करेन तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगेन,' असं ते लाजत म्हणाले. त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या बातम्या खऱ्या आहे की फक्त चर्चा, याचं उत्तर गुलदस्त्यात आहे.