मिस युनिव्हर्सचा ‘किताब जिंकलेली अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या चर्चेत आहे. लवकरच सुश्मिता ‘ताली’ या वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव करत आहे. ट्रान्सजेंडर एक्टिविस्ट गौरी सावंतच्या बायोग्राफीवर ही वेबसीरिज आधारित आहे. यात सुश्मिता सेन ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याआधी ती आर्या नावाच्या बेवसीरिजमध्ये झळकली होती. सुश्मिता सेन अनेकवर्ष मोठ्या पडद्यापासून दूर आहे याबाबतीत तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता/

चित्रपट समीक्षक सुचित्रा त्यागी यांच्याशी बोलताना तिने सांगितले होते की ‘मला हे पक्के ठाऊक होते की मला काय करायचे आहे काय करायचे नाही त्यामुळे गेल्या दहा वर्षात मी कामाचा प्राधान्यक्रम ठरवला होता. मला ज्या भूमिका करायच्या होत्या त्या मला चित्रपटातून मिळत नव्हत्या. त्याचबरोबरीने मला कल्पना होती माझे वय. स्क्रीनसमोरील माझा चेहरा या गोष्टी ध्यानात ठेवूनच मी १० वर्ष काम केले नव्हते’. बॉलिवूडमधील कामाबद्दल आणि स्वतःच्या ओळखीबद्दल ती पुढे म्हणाली, ‘मला माहित नाही की माझी मानसिकता काय होती किंवा कदाचित मी स्वतःला तिथे बाहेर ठेवत नव्हते. मी नेटवर्किंगमध्ये कधीच चांगली नव्हते’.

आता सैफने….” करीना कपूरने मुलांच्या जबाबदारीबद्दल केला खुलासा

सुश्मिता सेनची ‘आर्या’ वेबसीरिजचा पहिला सीजन २०२० साली प्रदर्शित झाला होता. शोचे दोन सीझन प्रसारित झाले आहेत आणि तिसरा प्रोडक्शन चालू आहे. यातील तिच्या कामाचे कौतुक झाले आहे. सुश्मिता शेवटची २०१० साली ‘दुल्हा मिल गया’ चित्रपटात शेवटची दिसली होती. सुश्मिताचे खासगी आयुष्यदेखील चर्चेत असते. नुकतेच तिचे ललित मोदीशी असलेले प्रेमप्रकरण चर्चेत आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सुश्मिता आता रवी जाधव यांच्या वेबसीरीजच्या चित्रीकरणात व्यस्त असणार आहे. ही वेब सीरिज वूट सिलेक्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. या वेबसीरिजचे एकूण ६ एपिसोड असणार आहेत. त्याद्वारे गौरी सावंतच्या आयुष्यातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर मांडले जाणार आहेत. या वेबसीरिजची निर्मिती अर्जुन सिंग बारान आणि कार्तिक डी निशंदर करत आहेत.