Abhishek Bachchan shares anecdote: अमिताभ बच्चन हे काही दिवसांपासून त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि ब्लॉगमधून त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनचे मोठे कौतुक करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘हॉलीवूड रिपोर्टर ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाला की, माझे वडील आता कौतुक करीत आहेत. पण जेव्हा मी लहान होतो, तरुण होतो, त्यावेळी त्यांनी कधीही अशा प्रकारे त्यांच्या भावना, प्रेम व्यक्त केले नाही. पुढे अभिनेत्याने २००४ मध्ये घडलेला एक किस्सा सांगितला.

“मी खूप घाबरलो होतो”

अभिषेक म्हणाला, “सिंगापूरमध्ये झालेल्या आयफा अवॉर्ड्समध्ये ‘युवा’चा प्रीमियर प्रदर्शित झाला. त्यावेळी मला वाटले की, मी चांगला अभिनय करू शकतो. लोक हा अभिनय बघू शकतात. स्क्रीनिंगनंतर शम्मी कपूर यांनी माझे कौतुक केले. गर्दी टाळ्यांचा कडकडाट करत होती. बाहेर आई उभी होती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. पण, माझ्या वडिलांनी मला सांगितले की, ते याबद्दल नंतर बोलतील. ते यावर कधीच बोलले नाहीत. त्यांना माझा ‘युवा’ चित्रपटातील अभिनय कसा वाटला हे त्यांनी ‘कॉफी विथ करण’मध्ये केलेल्या वक्तव्यानंतर समजले. ते म्हणाले की, मला ‘युवा’मधील अभिषेकचे काम आवडले नाही.”

अभिषेक पुढे म्हणाला, “आम्ही पहिल्यांदा सरकार या चित्रपटात एकत्र काम केले होते. पहिल्या दिवशी मी खूप घाबरलो होतो. मला घाम येत होता. ते मला शंकर म्हणून हाक मारतील आणि त्यावर मी वळून ‘जी’? म्हणणार, असा डायलॉग होता. पण, मी अक्षरश: थरथरत होतो. त्या सीनच्या शूटिंगनंतर मी तिथून दूर गेलो. कारण- मला वडिलांबरोबर घरी जायचे नव्हते; पण आपण एकाच गाडीतून घरी जाऊ, असा आग्रह वडिलांनी केला.”

“त्या संपूर्ण प्रवासात कोणी काहीच बोलले नाही. जेव्हा आम्ही घराजवळ पोहोचलो तेव्हा स्टाफ गाडीतून उतरला. त्यानंतर तिथे आम्ही दोघेच उरलो. माझे वडील तिथेच बसून राहिले. त्यानंतर ते माझ्याकडे वळले आणि मला म्हणाले की, मी इतकी वर्षं मेहनत करून, तुला यासाठी शिकवले? तुला एक डायलॉग म्हणता येत नाही. त्यानंतर त्यांनी निराशेनं मान हलवली. ते ज्या पद्धतीनं माझ्याकडे बघत होते, ते पाहून मला असं वाटलं की, कोणीतरी माझा खून करत आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सरकार’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो नुकताच ‘हाऊसफुल ५’मध्ये दिसला. लवकरच तो ‘कालीधर लापता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.