किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रोज वेगवेगळे विक्रम रचतोय. एकीकडे या चित्रपटाला जबरदस्त विरोध होत होता, पण प्रदर्शित होताच याने पूर्ण चित्रच पालटून टाकलं आहे. चित्रपटाचं सगळ्याच स्तरातून कौतुक होत आहे. याबरोबरच शाहरुखच्या फिटनेसचीसुद्धा जबरदस्त चर्चा होत आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी शाहरुखची ‘पठाण’मधील बॉडी कित्येकांना आकर्षित करत आहे. यासाठी शाहरुखने प्रचंड मेहनत घेतल्याचंसुद्धा समोर आलं आहे.

याच चित्रपटातील आणखी एका कलाकाराची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. चित्रपटात भारताला वाचवण्यात मदत करणाऱ्या अमोल हे पात्र साकारणारा अभिनेता आकाश बथीजा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आकाशने नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात त्याने त्याचा ‘फॅट टू फिट’ हा प्रवास मांडला आहे.

आणखी वाचा : कंगना रणौतने केलेला उर्मिला मातोंडकरचा ‘सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री’ म्हणून उल्लेख; नेमकं प्रकरण होतं तरी काय?

आकाशच्या या ट्रान्सफॉर्मेशनची जबरदस्त चर्चा होत आहे. ‘पठाण’मधून झळकण्यापूर्वी आकाशचं वजन ही १२६ किलो होतं, त्याचं एवढं वजन पाहता तो कधी शाहरुख खान आणि जॉन अब्राहमबरोबर एक अॅक्शनपट करेल असं त्यालाही कधीच वाटलं नव्हतं, पण त्याचे कोच राजेंद्र ढोले यांनी आकाशची खूप मदत केली आणि ६ महिन्यात आकाशला त्याच्यात फरक दिसू लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर मात्र आकाशला वर्कआउटची चटकच लागली, आणि त्याने स्वतः प्रचंड मेहनत घेऊन शरीर कमावलं आहे त्यामुळेच तो आज जॉन आणि शाहरुखसारख्या कलाकारांसमोर अॅक्शन करताना आपल्याला दिसत आहे. हाच प्रवास त्याने त्याच्या या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. १२६ किलो वजन असलेला आकाश आणि ‘पठाण’मध्ये दिसणारा आकाश याच्यातला फरक आपल्याला तो व्हिडिओ पाहताच लक्षात येतो.