बॉलीवूड अभिनेता आणि स्विस मिलिटरी वर्ल्डवाइड एमडी अनुज साहनी व मानव सुबोध यांनी या सिनेइंडस्ट्रीतील काळी बाजू उघड केली आहे. त्यांनी जे सांगितलं त्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. त्यांच्यामते, बॉलीवूड स्टार फक्त पार्टी, कॉन्सर्ट किंवा लग्नसमारंभात परफॉर्म करण्यासाठी पैसे घेत नाहीत तर अंत्यसंस्काराला जाण्यासाठीही पैसे घेतात.

‘बिग स्मॉल टॉक नाऊ’ या शोमध्ये ते म्हणाले की जिथं बॉलीवूड कलाकार जातात, तिथं आपोआप माध्यमं पोहोचतात. हे सेलिब्रिटी चित्रपटांव्यतिरिक्त चाहत्यांना पार्ट्या, मोठ्या उद्योगपतींची लग्नं, कॉन्सर्ट इत्यादींमध्ये दिसतात. याचबरोबर कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या अंत्यसंस्कार किंवा प्रार्थना सभेला बॉलीवूड स्टार्स हजेरी लावतात. अंत्यसंस्काराला जाण्यासाठी हे सेलिब्रिटी मोठी रक्कम आकारतात, असा दावा अनुज साहनी यांनी केला आहे.

२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

“मोठ्या स्टार्सची कमाई लग्नांमधून होते. ते लग्नाला जातात आणि नाचतात, त्याबदल्यात पैसे घेतात. इतकंच नाही तर अंत्यसंस्कार आणि तेराव्याला जाण्याचेही ते पैसे घेतात, त्यातून ते मोठी कमाई करतात. पण लोकांना याबद्दल माहिती नसते,” असं अनुज म्हणाले.

यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”

लग्नात जाण्यासाठी किती मानधन घेतात?

अंबानींच्या पार्टीत सलमान खान, शाहरुख खानसह अनेक बॉलीवूड स्टार्स परफॉर्म करताना दिसतात, पण तिथे ते मोफत परफॉर्म करतात. पण इतर बऱ्याच पार्ट्या किंवा मोठ्या लग्नांमध्ये परफॉर्म करण्यासाठी ते भरमसाठ पैसे घेतात. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान अशा कार्यक्रमांसाठी तीन कोटी रुपये घेतो.

चाहती अचानक स्टेजवर आली, मिठी मारली, हाताचं चुंबन घेतलं अन्…; प्रसिद्ध गायकाने केलं असं काही की… पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपिका पदुकोण इव्हेंट्समध्ये परफॉर्म करण्यासाठी दीड कोटी रुपये, रणवीर सिंग १.७५ कोटी रुपये घेते. रणबीर कपूरची फी दीड कोटी रुपये आहे आणि आलिया भट्टही तेवढंच मानधन घेते. वरुण धवन एक कोटी, कतरिना कैफ ५० लाख, सिद्धार्थ मल्होत्रा ​५० लाख घेतो. पंजाबी गायक दिलजीत दोसांझ एका परफॉर्मन्ससाठी तीन लाख रुपये घेतो.