मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाने स्वत:ची छाप पाडणारे अभिनेता म्हणजे अतुल कुलकर्णी. अल्पावधीतच त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाबरोबरच त्यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन व लेखनही केलेलं आहे. २०२२ च्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाचं लेखन त्यांनी केलं होतं.

‘पठाण’ चित्रपटाबाबत केलेल्या ट्वीटमुळे अतुल कुलकर्णींनी सध्या चर्चेत आहे. अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यातील शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘पठाण’ असं लिहित इमोजी पोस्ट केले आहेत. अतुल कुलकर्णींच्या या ट्वीटची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा>> Video: हातात दारुचा ग्लास अन् कंगना रणौतचा डान्स; पार्टीतील व्हिडीओमुळे अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले “हिंदू धर्म…”

हेही वाचा>> २०० कोटींच्या घोटाळा प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला पटियाला कोर्टाकडून मोठा दिलासा; दिला ‘हा’ निर्णय

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे वाद निर्माण झाला होता. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी परिधान करत रोमान्स केल्यामुळे शाहरुखचा ‘पठाण’ वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणीही होत होती. परंतु, बॉयकॉट ट्रेण्डमध्ये अडकूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे.

हेही वाचा>> Video:…अन् रणबीर कपूरने सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा फोनच फेकून दिला; व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी ५४ कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. दुसऱ्या दिवशीही विक्रमी कमाई करत ‘पठाण’ चित्रपटाने १२० कोटींचा टप्पा गाठला आहे.