गोविंदा हा ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. एकेकाळी सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्याने गेली कित्येक वर्ष बॉलीवूडपासून ब्रेक घेतला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त गोविंदाने नुकताच पापाराझींशी संवाद साधला. यावेळी त्याने गेल्यावर्षी जवळपास १०० कोटींचा प्रोजेक्ट नाकाल्याचा खुलासा केला.

हेही वाचा : नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”

गोविंदाने मंगळवारी आपल्या कुटुंबीयांबरोबर गणेश चतुर्थी साजरी केली. यानंतर अभिनेत्याने पापाराझींशी संवाद साधला. “आता पुन्हा चित्रपटात केव्हा काम करणार?” या प्रश्नाला उत्तर देत अभिनेता म्हणाला, “मी प्रत्येक काम खूप विचार करून निवडतो. अगदी सहजरित्या मी कोणतीही ऑफर स्वीकारत नाही. माझ्या याच स्वभावामुळे अनेकांना मला काम मिळत नाही असं वाटू लागलंय पण, हे साफ चुकीचं आहे. माझ्यावर खरंच बाप्पाची खूप जास्त कृपा आहे. गेल्यावर्षी मी १०० कोटींचा प्रोजेक्ट सोडला कारण, मला योग्य वाटतं तेच काम मी स्वीकारतो.”

हेही वाचा : “आता सुपरस्टार होणं कठीण झालंय”, नाना पाटेकर यांनी बॉलीवूडविषयी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले, “बॉक्स ऑफिसच्या कमाईवरून…”

अभिनेता पुढे म्हणाला, “माझ्याकडे येणारा कोणताही प्रोजेक्ट मी का स्वीकारत नाही? याचा विचार करून एक दिवस मी आरशासमोर उभा राहून स्वत:च्या कानाखाली मारून घेत होतो. समोरून मला भरपूर मानधन द्यायला तयार होते. पण, मला माझ्या मनासारख्या आणि एका विशिष्ट पातळीच्या भूमिका साकारायच्या आहेत. मी आधी केलेल्या आणि प्रेक्षकांना आवडणाऱ्या भूमिका माझ्याकडे आता आल्या, तर मी त्यांचा नक्कीच स्वीकार करेन.”

हेही वाचा : “बाप्पाच्या आगमनला सजली सर्व धरती…”; गणेश चतुर्थीनिमित्त माधुरी दीक्षितने शेअर केली खास पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गोविंदाने ९० च्या दशकात बॉलीवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ११ मार्च १९८७ रोजी सुनिता अहुजाशी त्याने लग्न केलं. या जोडप्याला यशवर्धन आणि टिना अशी दोन मुलं आहेत. काही दिवसांपूर्वी गोविंदा पॉन्झी घोटाळ्यामुळे चर्तेत आला होता.