अभिनेता सिद्धांत कर्णिक हा ‘आदिपुरुष’ व ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. सिद्धांतने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. सिद्धांतने ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूरच्या बहिणीच्या पतीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट खूप गाजला आणि इतर कलाकारांबरोबरच सिद्धांतच्या कामाचंही खूप कौतुक झालं होतं. सिद्धांतची चित्रपटातील भूमिका खूप महत्त्वाची होती. आता एका मुलाखतीत सिद्धांतने केलेलं विधान चर्चेत आहे.

सिद्धांत कर्णिकने एका मुलाखतीत म्हटलं की तो कॉफीपेक्षा सेक्सने दिवसाची सुरुवात करण्यास प्राधान्य देतो. तुला जोडीदारासोबत कसा दिवस घालवायला आवडेल, असं त्याला ‘फिल्मीज्ञान’ च्या मुलाखतीत विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला, “मला वाटतं की माझ्या दिवसाची सुरुवात सेक्सने करेन. कॉफीपेक्षा सेक्स चांगला आहे. त्यानंतर मी नाश्ता करेन, नाश्ता मी माझ्या जोडीदारासाठी स्वतः बनवेन, त्यानंतर मी तिचा चांगला मसाज करेन, मी माझा पूर्ण वेळ घरी घालवणं पसंत करेन.”

sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Harsh Chhaya on divorce with shefali shah
घटस्फोटानंतर २४ वर्षांनी शेफाली शाहचा पहिला पती म्हणाला, “आम्ही कधी एकमेकांसमोर आलो तर…”
once man misbehaved with priya bapat (1)
प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

सह-कलाकारांशी अफेअर करता येणार नाही, ‘या’ मालिकेच्या निर्मात्यांनी करारावर घेतली सही, अभिनेत्याने दिली माहिती

या मुलाखतीत सिद्धांतने ‘अ‍ॅनिमल’मधील त्याची सह-कलाकार तृप्ती डिमरीला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तृप्तीने या चित्रपटात झोया नावाचे पात्र साकारले होते. तृप्तीबरोबर डेटवर जायला आवडेल, असं सिद्धांत म्हणाला. संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ व्यतिरिक्त सिद्धांतने ‘लिसन अमाया’, ‘थप्पड’ आणि ‘आदिपुरुष’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘माही वे’, ‘ये है आशिकी’ आणि ‘एक था राजा एक थी रानी’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत.

सिद्धांतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तो घटस्फोटित आहे. त्याने २०१६ मध्ये मेघना गुप्ताशी लग्न केलं होतं, पण ते २०२० मध्ये विभक्त झाले.