बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आज त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘साथिया’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या कामाबरोबर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील चांगलाच चर्चेत आला होता. त्याचं आणि ऐश्वर्या रायचं असलेलं अफेअर आणि त्यानंतर त्यांचं झालेलं ब्रेकअप चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. तर ब्रेकअपनंतर जवळपास २० वर्षांनी त्याने त्याच्या आणि ऐश्वर्याच्या नात्यावर भाष्य केलं.

विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचं ब्रेकअप कोणापासून लपलेलं नाही. दोघांच्या ब्रेकअपची खूप चर्चा झाली होती. त्यांच्या विभक्त होण्याचे कारण ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खान असल्याचे म्हटलं गेलं. पण अनेक वर्षानंतर विवेक ओबेरॉयने यावर त्याचं मौन सोडलं. जवळपास २० वर्षांनंतर, त्याने सांगितलं की या ब्रेकअपने त्याचं संपूर्ण करिअर कसं उद्ध्वस्त केलं.

आणखी वाचा : काय सांगता! ‘पोन्नियिन सेल्वन २’साठी ऐश्वर्या रायने आकारले ‘इतके’ कोटी, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

एक मुलाखतीत विवेक म्हणाला होता, “माझ्या संपूर्ण कुटुंबाला माझा प्रचंड अभिमान आहे. माझ्या आयुष्यात अशी एक वेळ होती की इंडस्ट्रीतले अनेक बडे आसामी माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा माझा ‘शूटआउट अ‍ॅट लोखंडवाला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. माझ्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. मला पुरस्कार मिळाला पण इतकं सगळं होऊनही माझ्याकडे पुढचं एक, दीड वर्ष कोणतंही काम नव्हतं. कुणीच माझ्याकडे चित्रपटांची ऑफर घेऊन येत नव्हतं.”

हेही वाचा : “मला वडील व्हायचे होते पण…” सिंगल पॅरेंट होण्याबाबत सलमान खानचा मोठा खुलासा; म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर पुढे ऐश्वर्याबरोबरच्या ब्रेकअपबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी यावर काहीही बोलू इच्छित नाही. पण जर तुमच्याकडे कला आहे, तर दुसऱ्या कुणामुळे तुमची कला वाया जाऊ देऊ नका हेच मला सगळ्यांनाच हे सांगायचं आहे. ज्यांच्यासोबत तुम्ही भविष्याची स्वप्न पाहिलीत तोच तुमचा जोडीदार जर तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात, कामात अडचणी निर्माण करत असेल तर ते चूक आहे आणि असं मुळीच होऊ देऊ नका. तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रभाव तुमच्या व्यावसायिक आयुष्यावर मुळीच होऊ देऊ नका.” सध्या विवेक आणि ऐश्वर्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या कुटुंबासोबत आनंदात आहेत.