‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटातील रणवीर-आलियाची केमिस्ट्री सर्वांना आवडलीच पण त्यापेक्षाही अधिक चर्चा या चित्रपटातील एका वेगळ्याच सीनची होत आहे. हा सीन म्हणजे अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री शबाना आझमी यांचा किसिंग सीन. आता हा सीन कसा शूट करण्यात आला हे या चित्रपटातील एका अभिनेत्रीने उघड केलं आहे.

रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्याबरोबरच शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन, क्षिती जोग, अंजली आनंद या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अंजलीने धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीन कसा शूट केला? तेव्हा सेटवर कोण कोण लोक होते? हे सगळं सांगितलं आहे.

आणखी वाचा : पत्नी शबाना आझमी व धर्मेंद्र यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील किसिंग सीनवर ‘अशी’ होती जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थ कन्ननच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “हा सीन शूट करत असताना आम्ही सगळे खूप उत्सुक होतो. याचबरोबर आश्चर्यचकित ही झालो होतो. सेटवर सगळे शांत होते, कुठलाही आवाज नव्हता. आपल्यासमोर दोन दिग्गज कलाकार परफॉर्म करत आहेत यावर रणवीरचा विश्वासच बसत नव्हता. आम्ही बघत होतो शबानाजी गाण म्हणत चालत येत होत्या आणि त्यांच्या बाजूने वारा वाहत होता. मी आणि रणवीर इथे काय करतोय? असा विचार मी तेव्हा करत होते. एक वेळ रणवीर इथे असला तर ठीक आहे, पण मी खरोखर इथे असण्यास पात्र आहे का? असा विचार माझ्या मनात घोळत होता. हा सीन शूट झाला तेव्हा मला आणि रणवीरला खूप आश्चर्य वाटलं. हे खरोखरच आपल्यासमोर घडतंय का? असा प्रश्न आम्हाला पडला होता.”

हेही वाचा : “आज तुझ्यामुळे…,” शबाना आझमी यांनी मानले जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे आभार

दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ७५ हून अधिक कोटींचा गल्ला जमवला आहे.