शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट अखेर ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचे गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांबरोबरच अनेक कलाकारही या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. हा चित्रपट पाहून भूमी पेडणेकरने प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : खऱ्या आयुष्यात ‘असा’ आहे शाहरुख खान! गिरीजा ओकने केला खुलासा, म्हणाली, “त्याच्या स्वभावाबद्दल जे काही बोललं जातं ते सगळं…”

जवान चित्रपटगृहात जबरदस्त कामगिरी करत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल होत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. हा चित्रपट पाहिल्यावर सर्वजण सोशल मिडियावर प्रतिक्रिया देत आहेत. भूमी पेडणेकरनेही नुकताच हा चित्रपट पाहिला आणि सोशल मीडियावरून या चित्रपटाचं कौतुक करण्याची संधी तिने सोडली नाही.

हेही वाचा : “निर्मात्यांनी आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं होतं की…”, गिरीजा ओकचा ‘जवान’बद्दल मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लिहिलं, “हा माणूस… यासाठीच शाहरुख खानला लिजेंट म्हणतात. ‘जवान’ चित्रपटातील प्रत्येक क्षण खूप आवडला. आम्ही रडलो, टाळ्या वाजवल्या, शिट्ट्या वाजवल्या. खरंच खूप अप्रतिम ॲटली. नयनतारा, तुझं काम खूप सुंदर आणि ताकदीचं झालं आहे. दीपिका पदुकोणचंही काम अप्रतिम. विजय सेतुपती, तुम्ही या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आणि या चित्रपटातील गर्ल पॉवर – सान्या मल्होत्रा, पिलूमनी, गिरीजा ओक, लेहेर खान, इरिझा डोगरा, संगीता भट्टाचार्य… तुमच्या प्रत्येकीच्या कथेने हृदयात घर केलं आहे.” भूमीची ही पोस्ट आता लक्ष वेधून घेत आहे.