बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये हुमा कुरेशीच्या नावाचाही समावेश आहे. सध्या हुमा तिच्या आगामी ‘डबल एक्सएल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच सोनाही सिन्हाबरोबरचा तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. पण त्याआधीच हुमा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हुमा बॉलिवूड दिग्दर्शकाला डेट करत होती. आता या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला असल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा – Video : अभ्युदयनगरमधील छोटसं घर ते आलिशान फ्लॅट, आदेश बांदेकरांच्या स्वीट होमची झलक पाहिलीत का?

‘ईटाइम्स’च्या वृत्तानुसार, हुमा आणि दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांचं ब्रेकअप झालं आहे. पण ब्रेकअपनंतरही या दोघांमध्ये मैत्रीचं नातं असणार आहे. इतकंच नव्हे तर दोघंही मिळून यापुढेही चित्रपटांची निर्मिती करणार आहेत. दोघांमध्ये कोणतेच मतभेद नसून हुमा-मुदस्सरची मैत्री कायम असणार आहे.

हुमा-मुदस्सरचं ब्रेकअप नेमकं का झालं? याबाबत अद्यापही कोणतंच कारण समोर आलेलं नाही. ईटाइम्सला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या नात्यामध्ये कटूता निर्माण झाली. म्हणूनच दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचं ठरवलं. पण दोघंही समजूतदार आहेत. आपल्या कामामध्ये ते नातं मध्ये आणणार नसल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – मोरबी दुर्घटनेनंतर बॉलिवूडकरही हळहळले, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले, “शहरी नक्षलवाद्यांचा यामध्ये…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हुमाच्या आधी मुदस्सर अभिनेत्री सुष्मिता सेनला डेट करत होता. काही वर्ष सुष्मिता-मुदस्सर एकत्र होते. पण त्यानंतर काही वर्षांनी दोघांच्या नात्याचा दि एण्ड झाला. त्यानंतर हुमा-मुदस्सर एकमेकांच्या जवळ आले. हुमाच्या ‘डबल एक्सएल’ चित्रपटाचा लेखकही मुदस्सरच आहे.