मराठमोळ्या मृणाल ठाकूरने आपल्या दमदार अभिनयाने हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे मृणालचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मृणालने आपल्या अभिनयासह सौंदर्याने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. म्हणूनच मृणालचा कुठलाही फोटो किंवा व्हिडीओ असो तो व्हायरल होतं असतो.

सध्या मृणाल तिच्या ‘द फॅमिली स्टार’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ५ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मृणालसह अभिनेता विजय देवरकोंडा झळकला आहे. या चित्रपटातील Kalyani Vaccha Vacchaa या गाण्याने सगळ्यांचं थिरकायला भाग पाडलं. मृणाल व विजयचा हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे. अशातच सध्या मृणाल ठाकूरच्या इन्स्टाग्राम स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील वल्लरी विराज झळकली हिंदी चित्रपटात, कामाचं होतंय कौतुक

अभिनेत्री मृणाल ठाकूरने काही तासांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती चाहत्यांना आईने डब्यात दिलेले पदार्थ दाखवताना दिसत आहे. एका डब्यात मृणालच्या आईने लाह्या दिल्या आहेत. तर दुसऱ्या डब्यात फोडणी दिलेल्या गव्हाच्या लाह्या दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये मृणाल म्हणतेय, “जेव्हा आई डबा पाठवते तेव्हा…आमच्याकडे याला काय म्हणतात बरं सांगा?…याला म्हणतात लाह्या म्हणजेच पॉपकॉन.”

दुसऱ्या व्हिडीओमध्ये मृणाल गव्हाच्या लाह्या किती कुरमुरीत आहेत, हे दाखवत आहे. यामध्ये मृणाल म्हणतेय, “याच्याबरोबर कडीपत्ता पण खायचा. छान असतो आणि अशी पाचही बोटं तोंडात टाकून खायचं.” मृणालच्या या साधेपणाने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – अश्विनी एकबोटेंच्या लेकाचं लग्नानंतर पत्नीबरोबर देवदर्शन, फोटो शेअर करत म्हणाला…

हेही वाचा –Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल, प्रतिक्रियेचा पडतोय पाऊस, काय आहे नेमकं? पाहा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मृणाल ठाकूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने टेलिव्हिजनवरून अभिनय क्षेत्रातील सुरुवात केली. ‘खामोशियां’ या हिंदी मालिकेद्वारे मृणालने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने काही मालिकांमध्ये काम केलं. मग ‘लव्ह सोनिया’ चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘सुपर ३०’, ‘बाटला हाऊस’, ‘जर्सी’, ‘लस्ट स्टोरीज २’, अशा अनेक चित्रपटातून तिने काम केलं आणि विविधांगी भूमिका साकारल्या. याच बरोबर तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नशीब आजमाजवलं. तिचा ‘सीता रामम्’, ‘हाय नन्ना’ हे चित्रपट सुपरहिट झाले.