बॉलिवूडमधील कित्येक जोड्या लोकांनी डोक्यावर घेतल्या. राज कपूर-नर्गिसपासून रणवीर- दीपिकापर्यंत अशा कित्येक जोड्या आजही लोकांच्या आवडत्या आहेत. यातील काही जोडप्यांची कहाणी अधुरी राहिली तर काहींनी लग्नबेडीत अडकून सुखी संसार थाटला. अशीच प्रेक्षकांची एक आवडती जोडी म्हणजे ऋषी कपूर आणि नितू कपूर यांची. या जोडीने कित्येक उत्तमोत्तम चित्रपट दिले आणि लोकांनी त्यांची जोडी चांगलीच पसंत केली.

३० एप्रिल २०२० रोजी ऋषी कपूर यांचं निधन झाल्याची बातमी आणि सर्व चित्रपटसृष्टी हळहळली. चाहत्यांनीदेखील हळहळ व्यक्त केली. कपूर कुटुंबीयांसाठीही हा खूप मोठा धक्काच होता. ऋषी ही चित्रपटसृष्टीत चांगलेच कार्यरत होते. नितू कपूर आणि रणबीर कपूर यांनी कित्येकवेळा ऋषी यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीबद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : मुलाच्या पदार्पणासाठी शाहरुख घेतोय मेहनत; या लोकप्रिय लेखकाला प्रशिक्षक म्हणून नेमल्याची चर्चा

नुकतंच नितू कपूर यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन ऋषी कपूर यांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट केला आहे. हा पोस्ट शेअर करताना नितू कपूर फार भावुक झाल्या आणि त्यांनी लिहिलं की, “तुझ्या आवाजाची खूप आठवण येतीये, आजूबाजूला खूप शांत आहे.” नितू कपूर यांच्या या भावुक पोस्टवर कित्येक चाहते आणि कलाकार व्यक्त होत आहेत. सबा अली खान, मनीष मल्होत्रा यांनी नितू कपूर यांना धीर देत कॉमेंट केली आहे. तर काही चाहत्यांनी “ते अजूनही तुमच्या आसपासच आहेत” अशी कॉमेंट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकतंच आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाच्या निमित्ताने नितू कपूर यांनी काही फोटोज शेअर केले होते. रणबीर आणि आलियासाठी त्या खूप खुश आहेत असं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत आहे. नितू कपूर या ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात अनिल कपूर यांच्याबरोबर दिसल्या होत्या. या चित्रपटातील त्यांच्या कामाची चांगलीच प्रशंसा झाली.