यावर्षी सर्वात चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे ‘द काश्मीर फाइल्स.’ सात्यत्याने अधूनमधून चर्चेत येत आहे. मग ते चित्रपटाची ऑस्कर वारी असो किंवा काल इस्रायली दिग्दर्शकाच्या मतामुळे पुन्हा एकदा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसून येत आहे. इस्रायली दिग्दर्शकाने चित्रपटाला प्रपोगंडा, वल्गर म्हणून संबोधले आहे. त्यावरून आता समाज माध्यमातून दिग्दर्शकावर टीका होताना दिसून येत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी टीका केलीच मात्र आता त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर घडलेल्या प्रकारावर आपले निवेदन सादर केले आहे ज्यात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. ज्यात त्या म्हणाल्या आहेत की ‘कोणत्याही आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मिरी पंडितांच्या प्रश्नांनावर भाष्य केलेलं नाही.मी आणि विवेक कायमच जागरूक होतो की आम्हाला काय दाखवायचे नाही याबाबत, काश्मीर फाइल्सला वल्गर म्हणणाऱ्यांच्या विरोधात भारतीयांनी जो आवाज उठवला आहे त्याबद्दल भारावून गेलो आहोत. मी हे खात्रीने सांगून शकते हा चित्रपट प्रेक्षकांचा चित्रपट आहे. तसेच मी इस्राएलच्या दूतावासांचे आभार मानते. आम्हाला यापुढे अर्थपूर्ण आणि संपूर्णपणे भारतीय कन्टेन्ट असेलल्याकथेवर चित्रपट बनवायचा आहे.’ अशाच शब्दात यांनी आपली भूमिका मांडली आहे.

विश्लेषण : ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट व्हल्गर? IFFI मधील विधानांमुळे पुन्हा फुटलं वादाला तोंड; नेमकं झालं तरी काय?

पल्लवी जोशी यांनी या चित्रपटात कामदेखील केले आहे तसेच निर्मितीदेखील केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पल्लवी जोशी विवेक अग्निहोत्री ठिकठिकाणी फिरत होते. ‘द काश्मीर फाइल्स’ ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. केवळ २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींहून अधिक कमाई केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९९० मध्ये काश्मिरी पंडितांनी सहन केलेला अन्याय आणि त्यावेळी घडलेली परिस्थिती या चित्रपटाद्वारे सांगण्यात आली.‘द काश्मीर फाइल्स’मध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते