मनोरंजन सृष्टीत अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारत लोकप्रिय झालेल्या अनेक अभिनेत्री आज अभिनेत्री आणि बिझनेस वुमन अशा दुहेरी भूमिका सांभाळत आहेत. अभिनय क्षेत्रात काम करतानाच मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. तर आता यामध्ये परिणीती चोप्राची ही भर पडली आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा ही बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत ती अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिची बहीण प्रियांका चोप्रा हिच्या पावलावर पाऊल ठेवून ती यशाची शिखरं सर करत आहे. तर आता लवकरच ती एक नवी इनिंग सुरू करणार असल्याचं तिने जाहीर केलं.

आणखी वाचा : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी लग्नाबाबत घेतला मोठा निर्णय, लग्नाच्या प्लॅनमध्ये केला ‘हा’ बदल

परिणीती चोप्रा आता व्यवसायिक बनणार आहे. ती लवकरच तिचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू करणार आहे. ‘त्रितीया’ असं तिच्या या ज्वेलरी ब्रँडचं नाव आहे. आज सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तुम्ही याबाबत माहिती दिली. तर याबाबत उत्सुकता व्यक्त करत तिने अनेक महिन्यांपासून त्यावर काम करत असल्याचंही सांगितलं. ती हा व्यवसाय कंठी दत्त यांच्याबरोबर मिळून सुरू करत आहे. ८ सप्टेंबर रोजी ती यादीच्या नवीन व्यवसायाला सुरुवात करणार आहे.

हेही वाचा : उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल…

आता तिच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं असून त्यावर कमेंट करत तिथे चाहते आणि मनोरंजन सृष्टीतील तिची मित्रमंडळी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.