हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेत्री राखी सावंतनेही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पण त्या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

सतीश कौशिक यांचं काम बघत राखी सावंत लाहानाची मोठी झाली आहे. तर सतीश कौशिक यांच्या निधनानंतर विविध कलाकारांनी प्रतिक्रिया देऊन सतीश कौशिक यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राखी सावंतच्याही मनात सतीश कौशिक यांच्याबद्दल खास जागा आहे. आता त्याबद्दल तिला ट्रोल केलं जात आहे.

आणखी वाचा : “कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही…” सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल नीना गुप्ता यांनी व्यक्त केली हळहळ

राखी सावंतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ती सतीश कौशिक यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त करताना दिसत आहे. ती म्हणाली, “आज अत्यंत दुःखद दिवस आहे. सतीश कौशिक हे खूप मोठं नाव आहे. त्यांनी उत्तमोत्तम कलाकारांबरोबर एक से बढकर एक चित्रपट दिले. ते उत्कृष्ट अभिनेते होते. आपण लहानपणापासून त्यांच्या ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट पाहत आलो आहोत. त्यात ‘कॅलेंडर’ ही त्यांनी साकारलेली भूमिकाही प्रचंड गाजली. त्यांची ती भूमिका कोणीही कधीही विसरू शकत नाही.”

हेही वाचा : Video: “मला आई व्हायचं होतं पण त्याने…” राखी सावंतचा आदिल खानबद्दल मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण या व्हिडीओमध्ये राखी ज्या प्रकारे व्यक्त झाली ते अनेकांना आवडलं नाही. हा व्हिडीओ आऊट होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एका नेटकाऱ्याने लिहीलं, “हिची प्रतिक्रिया घेण्याची गरज होती का?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हो. सगळ्यात जास्त दुःख हिलाच झालंय.” आणखी एका नेटकाऱ्याने लिहीलं, “निधनाबाबत दुःख व्यक्त करतानाही हिचा नाटकीपणा बंद होत नाही. ही ओव्हर अ‍ॅक्टिंगचं दुकान आहे.”