Shehnaaz Gill Weight Loss Plan: बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री शहनाज गिल आता खूपच फिट झाली आहे. ‘बिग बॉस हिंदी’मध्ये असताना शहनाजचं वजन खूप जास्त होतं. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर शहनाजने झपाट्याने वजन कमी केले आणि आज ती खूप सुंदर दिसते. शहनाज गिलने निरोगी पद्धतीने तिचे वजन कसे कमी केले ते जाणून घेऊया.

शहनाजने सहा महिन्यांत ५५ किलो वजन कमी केले. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शहनाज गिलचा आहार कसा असतो, ती कोणते पदार्थ खायची ते पाहुयात.

शहनाज तिच्या दिवसाची सुरुवात हळदी टाकलेले कोमट पाणी व चहा पिऊन करते. हळदीचे सेवन केल्याने तिची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते. यानंतर शहनाज एक तास योग करते. यामुळे तिचे मन शांत राहते आणि शरीर फिट व लवचिक राहते.

शहनाज गिलचा नाश्ता

शहनाजचा नाश्ता पौष्टिक असतो. त्यात प्रामुख्याने कमी तेलात बनवलेला डोसा, मूग डाळ, भाज्या वापरून बनवलेले पोहे यांचा समावेश असतो.

या सर्व पदार्थांमध्ये प्रथिने, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात, जे दिवसभर तिला ऊर्जा देतात.

शहनाज गिलचे दुपारचे जेवण

शहनाज दुपारच्या जेवणात डाळ, ताजे सलाद, स्प्राउट्स, स्क्रॅम्बल टोफू व तूप लावलेली गव्हाची पोळी खाते. तिचे दुपारचे जेवण प्रोटीन, फायबर व न्यूट्रियंट्सयुक्त असते. यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते.

संध्याकाळी काय खाते शहनाज?

शहनाज गिल रोज संध्याकाळी तुपात भाजलेले मखाने खाते. त्यात फायबर, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे पाचन सुधारते व थोडी भूक लागली असेल तर पोटही भरते.

रात्रीच्या जेवणात हलका आहार घेते शहनाज गिल

रात्रीच्या जेवणात शहनाज खिचडी, दही व दुधी भोपळ्याचे सूप पिते. हलका आहार घेत्याने ब्लोटिंग, अपचन व अॅसिडिटीचा त्रास होत नाही आणि झोप चांगली लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांगली झोप व तणावमुक्त आयुष्य

शहनाजच्या मते चांगली झोप व तणावापासून दूर राहणं या गोष्टी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. ती दिवसभर खूप पाणी पिते आणि शरीराच्या गरजेनुसार डाएट व रूटीनमध्ये बदल करते.

शहनाजचा सल्ला

  • सकस व संतुलित डाएट घ्या
  • जास्त स्ट्रिक्ट डाएट करू नका, मॉडरेशन करा
  • सातत्य ठेवा
  • तुमची वजन कमी करण्याची प्रक्रिया ट्रॅक करा आणि संयम ठेवा