अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. याशिवाय ती अनेक कार्यक्रमांना हजेरी लावते. आता एका मुलाखतीत उर्वशीला क्रिकेटपटू ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर तिने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

वर्षभरापूर्वी उर्वशी रौतेला आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत या दोघांमधील शाब्दिक वाद चांगलाच गाजला होता. पण ऋषभचा अपघात झाल्यानंतर उर्वशीने त्याच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर बऱ्याचदा उर्वशीला ऋषभबद्दल विचारण्यात येतं पण ती उत्तर देणं टाळते. आता तिने ‘इन्स्टंट बॉलीवूड’ला एक मुलाखत दिली, या मुलाखतीत तिला ऋषभशी लग्न करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

शरद पोंक्षेंची रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाले, “खूप लोक…”

“ऋषभ पंत तुझा खूप आदर करतो, तो तुला आनंदी ठेवेल, तू त्याच्याशी लग्न केलं तर आम्हाला आनंद होईल,” अशी एका चाहत्याची कमेंट होती. यावर उर्वशीला तिची प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर उर्वशीने फक्त दोन शब्दात उत्तर दिलं. “नो कमेंट्स” असं ती म्हणाली.

१७ मिनिटांचा किसिंग सीन अन् ब्लॉकबस्टर सिनेमात काम, एकेकाळी ९०० रुपये महिना कमवायची आमिरची हिरोईन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीड वर्षांपूर्वी उर्वशीने एका मुलाखतीत दावा केला होता की, आरपी नावाची व्यक्ती एकदा त्याला भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये तासनतास थांबली होती. यानंतर पंतने उर्वशीचे नाव न घेता इन्स्टाग्रामवर निशाणा साधला होता. नंतर दोघांनीही एकमेकांची नावं न घेता बऱ्याच पोस्ट टाकल्या होत्या. त्यांचा सोशल मीडियावरील शाब्दिक वाद खूप चर्चेत राहिला होता.