अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटेमुळे प्रसिद्धीझोतात आली. अदाचा आगामी चित्रपट ‘बस्तर’चा टिझर प्रदर्शित झाला असून १५ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अदा अभिनयासह तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही सोशल मीडियावर शेअर करत असते. ती मराठी भाषाही उत्तमरित्या बोलते आणि अनेकदा सोशल मीडियावर ती मराठीत गाणी म्हणून चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

अदा ९ फेब्रुवारीला मुंबई विमानतळावर दिसली. नेहमीच तिच्या लूक्स आणि फॅशनमुळे चर्चेत असणाऱ्या अदाने एअरपोर्ट लूकसाठी आजीची साडी निवडली होती. पापाराजीने तिचा हा लूक पाहून “तुम्ही या साडीत अतिशय सुंदर दिसताय.” अशी कमेंट केली. यावर अदा म्हणाली, “ही माझ्या आजीची साडी आहे. माझी आजी जेव्हा २५ वर्षांची होती तेव्हा तिने ही साडी नेसली होती. आता ती ९० वर्षांची आहे. मी विचार केला की चला आज आजीची साडी नेसूया.”

पापाराझीसाठी अदाने काही पोजेस ही दिल्या. अदाची साडी फिकट तपकिरी रंगाची असून त्यावर तिने लाल रंगाचा ब्लाऊज घातला केला होता.

हेही वाचा… मानसी नाईकला ‘अशी’ मिळाली ऐश्वर्या राय ही ओळख, किस्सा सांगत म्हणाली, “देवदासचा आयकॉनिक सीन…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अदाच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, ‘बस्तर’ या चित्रपटात अदा झळकणार आहे. हा चित्रपट छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटात अदा शर्मा प्रमुख भूमिकेत असून अनंगशा बिस्वास , यशपाल शर्मा, शिल्पा शुक्ला हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.