ड्रामा क्वीन राखी सावंतचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. राखीने पती आदिल खान विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ७ फेब्रुवारी (मंगळवारी) आदिलला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आदिलच्या अटकेनंतर राखीने त्याच्यावर गंभीर आरोपही केले. आदिल राखीला मारायला तिच्या घरी गेला होता असं तिचं म्हणणं होतं. आता राखीचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “तुम्हाला हे शोभत नाही” म्हणत अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी केलेलं ट्रोल; त्याच फोटोंवर जॅकी श्रॉफ कमेंट करत म्हणाले…

ओशिवरा पोलिस ठाण्याबाहेर राखीला पापाराझी छायाचित्रकारांनी तसेच प्रसार माध्यमांनी घेरलं. यावेळी राखी अगदी निराश दिसत होती. यावेळी राखीला आदिलबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिच्याबरोबर काही भलतंच घडलं. राखी अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळली.

पाहा व्हिडीओ

राखी खाली पडताच एकच गोंधळ उडाला. तिच्या संपूर्ण टीमने राखीला पकडून गाडीच्या दिशेने नेलं. तसेच तिला गाडीमध्ये बसवलं. यावेळी राखीला चालण्याचीही ताकद नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं. दरम्यान “आदिल मला दिवसभर फोन करत होता” असं राखी म्हणत असतानाच तिला चक्कर आली.

आणखी वाचा – शिव ठाकरेसाठी महेश मांजरेकरांसह इतरही मराठी कलाकार एकवटले, तर ‘बिग बॉस’ स्टार्सचे आई-वडील म्हणतात, “आमचा लेक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यामागचं कारण म्हणजे तिला चक्कर आली तरी तिने तिच्या हातातला फोन काही सोडला नाही. यावरुनच राखीला खरंच चक्कर आली का? ती नाटक करत होती का? असे अनेक प्रश्न नेटकरी कमेंट्सच्या माध्यमातून विचारत आहेत.