Rashmika Mandanna Reaction on Fake Viral Video : अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक मॉर्फ व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. सोशल मीडियावर या व्हिडीओमुळे चांगळीच खळबळ माजली. या व्हिडीओबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह इतर कलाकारांनी तसेच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. बिग बी यांनी याविरोधात त्वरित कारवाई करण्याची विनंतीही केली. त्यानंतर खुद्द रश्मिका मंदानाने स्वतः यावर प्रतिक्रिया दिली.

इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत रश्मिकाने तिच्या भावना मांडल्या. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर रश्मिका नुकतीच मीडियासमोर आली आहे. सोशल मीडियावर सध्या तिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका चांगलीच बिथरलेली दिसत आहे. मीडिया रिपोटर्स आणि फोटोग्राफरनी तिच्या भोवती गराडा घातल्याने रश्मिका चांगलीच गोंधळली असल्याचं या व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे.

आणखी वाचा : “टायगर बूढ़ा है बॉक्स ऑफिसवर…” प्रसिद्ध अभिनेत्याने उडवली भाईजानची खिल्ली; आमिर खानवरही केली टीका

रश्मिका नुकतीच तिच्या आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आली. मुंबईच्या ‘टी-सीरिज’चया कार्यालयाबाहेरच मीडियाच्या लोकांनी घेरलं. दरम्यान अभिनेता रणबीर कपूरही रश्मिकाबरोबर आला आणि तिला या सगळ्या गराड्यातून बाहेर पडायला मदत केल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. ‘अॅनिमल’च्या प्रमोशनसाठी रश्मिका मुंबईत आल्याचं स्पष्ट होत आहे.

आपल्या व्हायरल होणाऱ्या डिपफेक व्हिडीओबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट करताना रश्मिकाने लिहिलं, ““माझा डीपफेक व्हिडीओ ऑनलाइन मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालंय. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. एक महिला व एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांचे आभार मानते कारण ते माझे संरक्षक आणि सपोर्ट सिस्टिम आहेत. पण हे मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना घडलं असतं तर मी हे कसं हाताळलं असतं, याची मला कल्पनाही करवत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे आणि तिने अतिशय बोल्ड ड्रेस परिधान केलेला आहे. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे. हा व्हिडीओ रश्मिका मंदानाचा नसून झारा पटेलचा आहे. झारा ही ब्रिटिश-भारतीय वंशाची तरुणी आहे.