मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान अगदी मोजकेच चित्रपट करतो. त्याचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे ‘लाल सिंह चड्ढा’. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. आमिरच्या या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा फार कमी कमाई केली. या चित्रपटाने प्रेक्षकांचाही अपेक्षाभंग केला. आता या चित्रपटानंतर आमिरचा एक नवा लूक समोर आला आहे. यामध्ये आमिरचा बदलता अवतार पाहून सारेच जण आश्चर्यचकित झाले आहेत.

आणखी वाचा – मला पुरुषाची गरज नाही म्हणत स्वतःशीच लग्न करणारी अभिनेत्री गरोदर? फोटो शेअर करत म्हणाली, “मी स्वतःच…”

सोशल मीडियावर आमिरचे नव्या लूकमधील फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये तो अगदी वेगळाच दिसत आहे. पांढरी वाढलेली दाढी तसेच त्याचं वजनही अगदी कमी झालेलं पाहायला मिळत आहे. हे पाहून त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पाहा व्हिडीओ

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या आईचं निधन झालं. यादरम्यानच आशुतोष यांना भेटण्यासाठी आमिर त्यांच्या घरी पोहोचला होता. त्यांच्या घरातून बाहेर पडताना आमिरला पापाराझी छायाचित्रकारांनी घेरलं. तेव्हा त्याचा हा लूक पाहायला मिळाला.

आणखी वाचा – अभिनेत्री सई ताम्हणकरचा पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा, म्हणाली “त्या दिवशी रात्रभर दारू प्यायलो अन्…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा आमिर खानच आहे ना…, आमिर खान आता म्हातारा झाला आहे, आमिर खानला नक्की काय झालं अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून केल्या आहेत. ‘लाल सिंह चड्ढा’च्या अपयशानंतर आमिरच्या सुपरहिट चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत.