ऑगस्ट महिन्यात दोन बॉलिवूड स्टार्सचे चित्रपट आमने-सामने येणार आहेत. ११ ऑगस्ट या दिवशी सनी देओल व अमीषा पटेलचा ‘गदर २’ आणि अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘ओह माय गॉड २’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या दोन्ही चित्रपटांची प्रचंड चर्चा आपल्याला सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ‘ओह माय गॉड २’ ला सेन्सॉरकडून ‘ए सर्टिफिकेट’ मिळालं असून काही किरकोळ बदलही त्यात सुचवले. यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला.

आता या चित्रपटापाठोपाठ सनी देओलच्या ‘गदर २’मध्ये सेन्सॉर बोर्डने काही बदल सुचवले आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाच्या पहिल्या भागाशी प्रेक्षकांच्या बऱ्याच आठवणी जोडलेल्या आहेत त्यामुळे याच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. मीडिया रीपोर्टनुसार ‘गदर २’ला सेन्सॉर बोर्डने १० कट्स सुचवले आहेत. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार ‘गदर २’ला ‘यू/ए सर्टिफिकेट’ दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या कमाईत घट; आठवड्याभरातही १०० कोटींचा टप्पा पार करणं ठरलं कठीण

चित्रपटातील एका सीनमध्ये दंगेखोरांच्या तोंडी असलेला ‘हर हर महादेव’ हा संवाद हटवण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर चित्रपटात ‘बास्टर्ड’ ऐवजी ‘इडियट’ हा शब्द वापरण्यात आला आहे. चित्रपटात रक्षामंत्री यांचं नावही बदलण्यात आलं आहे. ‘तिरंगा’ हा शब्दही चित्रपटातून हटवण्यात आला असल्याचं स्पष्ट झालं आहे. असे वेगवेगळे तब्बल १० बदल या चित्रपटात सुचवले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच चित्रपटात १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धाचे संदर्भ असल्याने त्यासंदर्भातील पुरावेसुद्धा सादर करायला सेन्सॉर बोर्डने निर्मात्यांना सांगितले आहे. ‘गदर २’चं पहिल्या दिवसाचे शोज बऱ्याच ठिकाणी हाऊसफुल्ल झाले आहेत. १४ हजारहून जास्त तिकीटं विकली गेली असल्याचंही सांगितलं जात आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा हा बहुप्रतीक्षित चित्रपट बॉक्स ऑफिसवर नेमकी काय कमाल दाखवणार ते येणारा काळच ठरवेल.