Aishwarya Rai-Bachchan : गेल्या कित्येक महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. अलीकडेच ऐश्वर्या ‘साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवार्ड्स’ (SIIMA 2024) या पुरस्कार सोहळ्यासाठी दुबईला गेली. यावेळी नेहमीप्रमाणे ऐश्वर्या लाडकी लेक आराध्यासह दुबईला रवाना होताना दिसली. यादरम्यान तिच्या बोटात लग्नाची अंगठी नसल्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखीच उधाण आलं. पण असं असलं तरी SIIMA 2024 पुरस्कार सोहळ्यात आराध्या ऐश्वर्याची सपोर्ट सिस्टिम म्हणून पाहायला मिळाली. या सोहळ्यातील ऐश्वर्या व आराध्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

दुबईत आयोजित केलेल्या SIIMA 2024 या पुरस्कार सोहळ्यासाठी ऐश्वर्या राय-बच्चनने ( Aishwarya Rai-Bachchan ) ब्लॅक आणि गोल्डन गाउन परिधान केला होता. तर आराध्या सिल्वर आणि ब्लॅक शिमरी आउटफिटमध्ये पाहायला मिळाली. या सोहळ्यातील रेड कार्पेटवर ऐश्वर्याने लाडक्या लेकीचा हातात हात घेऊन एन्ट्री केली. यावेळी दोघी एकत्र पोज देताना दिसल्या. एवढंच नव्हे तर दोघींनी एकमेकांना किस देखील केलं.

हेही वाचा – Video: धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकरमध्ये बिनसलं, डीपी नाराजी व्यक्त करत म्हणाला, “आता बास झालं…”

SIIMA 2024 मध्ये ऐश्वर्या राय-बच्चनला ( Aishwarya Rai-Bachchan ) ‘पोन्नियिन सेलवन: २’ या चित्रपटासाठी समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. निर्माता कबीर खानच्या हस्ते ऐश्वर्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आपल्या आईला पुरस्कार घेताना पाहून आराध्या खूप आनंदी झाली. तिने आपल्या आईचा हा कौतुकाचा क्षण लगेच मोबाइलमध्ये टिपला. ऐश्वर्या पुरस्कार घेतानाचे फोटो आणि व्हिडीओ आराध्या काढताना दिसली.

पुरस्कार घेतल्यानंतर ऐश्वर्या राय-बच्चन ( Aishwarya Rai-Bachchan ) म्हणाली, “मला पुरस्कार देऊन गौरविल्यामुळे मी SIIMAचे खूप खूप आभार मानते. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळचा होता. ‘पोन्नियिन सेलवन’चे दिग्दर्शन, माझे गुरू मणिरत्नम यांनी केलं होतं. ‘पोन्नियिन सेलवन’मधील नंदिनीच्या भूमिकेसाठी माझ्या गौरव झाला हे खरोखर संपूर्ण टीमच्या कामाची पोचपावती आहे.”

हेही वाचा – “मी हरखून गेलो…”, अभिनेता सुव्रत जोशीला कॅबमध्ये आला एक वेगळाच अनुभव, म्हणाला, “मला कलाकार म्हणून खूप काही देऊन गेला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘पोन्नियिन सेलवन: २’ चित्रपटात ऐश्वर्या राय-बच्चनने दुहेरी भूमिका साकारली आहे. नंदिनी आणि मंदाकिनी देवी या दोन भूमिकेत ऐश्वर्या झळकली आहे. एका तामिळ कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या व्यतिरिक्त कार्ती, जयम रवी, त्रिशा, जयराम, प्रभू, आर सरथकुमार, शोभिता धुलिपाला, ऐश्वर्या लक्ष्मी, विक्रम प्रभू, प्रकाश राज, रहमान आणि आर पार्थिवन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.