Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय-बच्चन व अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगली आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाला ऐश्वर्या बच्चन कुटुंबासह एकत्र उपस्थित न राहिल्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेला वाव मिळाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनने देखील अशी काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती; ज्यामुळे ऐश्वर्याबरोबर घटस्फोट झाल्याच्या चर्चांना आणखीन उधाण आलं. पण ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे येत्या काळातच स्पष्ट होईल. मात्र या घटस्फोटोच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या न्यूयॉर्कमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. तिचा न्यूयॉर्कमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबरचा फोटो व्हायरल झाला आहे.

लाडक्या लेकीबरोबर ऐश्वर्या व्हेकेशन करतेय एन्जॉय

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ( Aishwarya Rai Bachchan ) सध्या मुंबईपासून दूर न्यूयॉर्कमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तिच्याबरोबर अभिषेक बच्चन नसून लाडकी लेक आराध्या आहे. ऐश्वर्या आराध्याबरोबर न्यूयॉर्कमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : “अत्यंत लज्जास्पद…”, निक्कीने वर्षा उसगांवकरांचा अपमान केल्यामुळे मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “रितेश देशमुख…”

प्रसिद्ध अभिनेत्री आणि पॉडकास्टर जेरी रेयनाने सोशल मीडियावर ऐश्वर्या राय-बच्चनबरोबरचे ( Aishwarya Rai Bachchan ) दोन फोटो शेअर केले आहेत. याआधीही जेरी ऐश्वर्याला भेटली होती. या जुन्या भेटीचा फोटो आणि नुकत्याच झालेल्या भेटीचा फोटो जेरीने शेअर केला आहे. ऐश्वर्याबरोबरचे हे फोटो शेअर करत तिनं लिहिलं आहे, “आपल्या आयुष्यातील आदर्श व्यक्तीला दोनदा भेटणं हे भाग्यशाली आहे. ऐश, माझ्याशी नेहमी खूप चांगलं वागल्याबद्दल धन्यवाद. माझ्या आयुष्यात तुझ्या येण्याने काय परिणाम झाला हे मी तुला सांगितलं. तू माझ्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकल्यास त्याबद्दल तुझे आभार मानणं हे माझं नेहमीच एक स्वप्न होतं. तुला या जगातील सर्व आनंद मिळालो, हीच इच्छा.”

Aishwarya Rai Bachchan

हेही वाचा – अमिताभ बच्चन यांच्याकडून सोशल मीडियावर झाली चूक, ‘त्या’ पोस्टवरून मागितली माफी

हेही वाचा – ‘हा’ कोणत्या लोकप्रिय मालिकेचा फोटो आहे? ओळखा पाहू, १० वर्षांपूर्वी झाली होती सुपरहिट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऐश्वर्या राय-बच्चनच्या ( Aishwarya Rai Bachchan ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची मणिरत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वन १’ आणि २ मध्ये पाहायला मिळाली होती. तसंच अभिषेक बच्चन स्पोर्ट्स ड्रामा ‘घूमर’ चित्रपटात झळकला होता. त्यानंतर आता अभिषेक बच्चन ‘बी हॅप्पी’, ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटांमध्ये दिसणार आहे.