Aishwarya Rai Old Unseen Photos: पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांबाबत नेहमीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असते. कलाकारांची घरे कशी असतात इथपासून ते त्यांच्या खासगी आयुष्यात काय चालले आहे, ते जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते.
अनेकदा कलाकार आणि त्यांच्या मुलांची सतत तुलना होताना दिसते. तसेच, आपल्या आवडत्या कलाकारांच्या मुलांबाबत जाणून घेण्यासही प्रेक्षक उत्सुक असतात. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांची मुले त्यांच्या आई-वडिलांच्या प्रसिद्धीमुळे अगदी लहान वयातच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्याचे पाहायला मिळते.
त्यामध्ये सैफ अली खान व करिना कपूर यांची मुले तैमूर व जेह, आलिया भट्ट व रणबीर कपूर यांची मुलगी राहा, बिपाशा बासू व करण सिंह ग्रोवर यांची मुलगी देवी अशा अनेक सेलिब्रिटींच्या मुलांची सातत्याने चर्चा होतान दिसते. या मुलांचा चाहतावर्गही मोठा असल्याचे पाहायला मिळते.
आता या सगळ्यात आणखी एका स्टारकिडची मोठी चर्चा रंगताना दिसते. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्या बच्चनचीही मोठी चर्चा होताना दिसते. आराध्या अनेकदा तिच्या आईबरोबर म्हणजेच ऐश्वर्या रायबरोबर विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. मायलेकींची ही जोडी कायमच लक्ष वेधून घेताना दिसते.
ऐश्वर्या रायचे जुने अनसीन फोटो पाहिलेत का?
आता ऐश्वर्या राय व तिची लेक आराध्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या लहानपणीचे फोटो पाहायला मिळत आहेत. त्यावरून चाहते ऐश्वर्या व आराध्या यांच्या दिसण्यावरून त्यांची तुलना करताना दिसत आहेत. क्लासिक देसी सेलेब्सने ऐश्वर्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
लहानपणी ऐश्वर्या राय जशी दिसायची, तशी आता तिची लेक आराध्या दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या जेव्हा १० किंवा १२ वर्षांची असेल तेव्हाचा एक फोटो पाहायला मिळत आहे. या फोटोत ऐश्वर्या छोटे केस असलेली, हेअरबेल्ट लावलेली पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या पेहरावात दिसत आहे, ज्यामधील तिच्या केसांची स्टाईल व आराध्याच्या केसांची स्टाईल सारखीच दिसत आहे.
नेटकरी काय म्हणाले?
त्यावर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स करीत त्यांची तुलना केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “आराध्या ऐश्वर्यासारखीच आहे.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “मला आता समजले की आराध्याला हेअरस्टाईलची प्रेरणा कुठून मिळते.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “मला अचानक जाणवले की, ऐश्वर्याच्या मुलीमध्ये तिची वैशिष्ट्ये आहेत.” अशा अनेकविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत.



दरम्यान, ७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या रायने पारंपरिक पेहराव परिधान केला होता. तिच्या या लूकचे मोठे कौतुक झाले. त्याबरोबरच कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यानचा हा आराध्याबरोबरचा अभिनेत्रीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसला.