अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायने प्रेमविवाह केला होता. दोघांच्या लग्नाला १६ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. दोघांना आराध्या नावाची मुलगी आहे. लग्नानंतर ऐश्वर्या बच्चन आडनाव लावते. तसेच तिचा अमिताभ बच्चन यांची सून किंवा बच्चन कुटुंबाची सून म्हटलं जातं. बच्चन आडनावाचा तुझ्या ऐश्वर्या राय या स्वतंत्र ओळखीवर परिणाम होतो का? असं तिला एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. त्यावर तिने दिलेलं उत्तर जाणून घेऊयात.
श्वेता नंदाला वहिनी ऐश्वर्याची ‘ही’ गोष्ट अजिबात आवडत नाही; म्हणालेली, “ती कधीच…”
२००८ मध्ये ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याला विचारण्यात आलं होतं की बच्चन आडनावाचा तिच्या ‘ऐश्वर्या राय’ या ओळखीवर परिणाम होतो, असं तिला वाटतं का? यावर ती म्हणालेली, “माझ्या आयुष्यावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. ‘बच्चन बहू’ असं ते वाचताना बरं वाटावं, यासाठी लिहिलं जातं. ते थोडं ड्रॅमेटिक वाटतं. खरं तर मी फक्त एक सामान्य मुलगी आहे. मी ऐश्वर्या राय आहे जिने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. तर, आज बच्चन हे माझेही आडनाव आहे.”
ऐश्वर्या पुढे म्हणाली, “मला असं वाटतं की या कुटुंबातील सदस्य प्रसिद्ध आहेत. या कुटुंबातील लोकांनी सार्वजनिकरित्या ओळख मिळवली आहे म्हणून त्यांच्या नावाला विशेष महत्त्व दिलं जातं. बच्चन कुटुंबातील लोक त्याची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करतात. आम्ही एक कुटुंब आहोत. अभिषेक आणि माझे एकमेकांवर प्रेम होते, आम्हाला आमच्या कुटुंबाचे आशीर्वाद मिळाले आणि आम्ही लग्न केले.”