बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी हे इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीजपैकी एक आहे. अजय देवगणच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या ‘सिंघम’ या चित्रपटाचे नाव निश्चितपणे टॉप लिस्टमध्ये सामील होईल. अजयने आतापर्यंत सिंघम आणि सिंघम रिटर्न्समधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आता अजय देवगण आणि रोहीत शेट्टी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज आहेत. सिंघमचा तिसरा भाग अर्थात ‘सिंघम अगेन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा- कतरिना कैफ गरोदर? सलमान खानच्या बहिणीच्या ईद पार्टीतल्या ‘त्या’ VIDEO नंतर चर्चा

अजयच्या ‘सिंघम अगेन’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर झाली आहे. ‘सिंघम अगेन’ हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मार्च २०२३ मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. ‘सिंघम’ आणि ‘सिंघम २’ हे दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता प्रेक्षक ‘सिंघम ३ ‘ची प्रतीक्षा करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील शेवटचे दोन भाग ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ यांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. अशा परिस्थितीत ‘सिंघम अगेन’ पुढील वर्षीच्या दिवाळीत काय कमाल दाखवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. याबरोबरच रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये रणवीर सिंगच्या ‘सिंबा’ आणि अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चीसुद्धा धमाकेदार एंट्री झाली होती. आता सिंघम अगेन चित्रपटात नेमकी कोणती सरप्राइज बघायला मिळणार आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुन्हा रेकॉर्डब्रेकिंग कमाई करणार का हे येणारा काळच ठरवेल.