बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतात आणि आताही काहीसं असंच घडलं आहे. रविवारी रात्री झालेल्या दिवाळी पार्टीला इतर बॉलिवूड सेलिब्रेटींसह न्यासा देवगणनेही हजेरी लावली होती. पण यावेळी ती अशा लूकमध्ये दिसली की तिला ओळखणंही अनेकांसाठी कठीण झालं होतं. दिवाळी पार्टीमध्ये न्यासा देवगण निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. पण यावेळी ती न्यासा आहे हे ओळखणं कठीण होतं.

न्यासा देवगणचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये कारमधून जाताना ती खूपच स्टनिंग दिसतेय पण फोटोग्राफर्सना पोज देणं टाळताना दिसत आहे. याशिवाय ती याच व्हिडीओमध्ये तिच्या मित्राशी काहीतरी बोलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा- सुशीलकुमार शिंदे यांच्या नातवाला पुन्हा डेट करतेय जान्हवी कपूर? पाहा Viral Video

न्यासाचा हा लूक पाहून तिने तिच्या चेहऱ्याची सर्जरी केल्याचं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. तर न्यासाने नाकावर शस्त्रक्रिया केल्याचंही काही युजर्सचं म्हणणं आहे. अनेकांनी तर न्यासा जान्हवीसारखी का दिसतेय, तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे का? असा सवालही केला आहे.

आणखी वाचा- “ही तर त्यांच्यापेक्षाही गरीब…” न्यासा देवगणचा Viral Video पाहून नेटकरी भडकले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये न्यासा पूर्णपणे बदललेली दिसत आहे. त्याआधी जेव्हा न्यासा देवगण भूमी पेडणेकरच्या पार्टीत पोहोचली होती, तेव्हा तिच्या जबरदस्त स्टाइलचं खूप कौतुक झालं होतं. न्यासा अनेकदा सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. ती कधी मित्रांसोबत पार्टी करताना तर कधी फिरायला गेल्यावर इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत असते.