scorecardresearch

“ही तर त्यांच्यापेक्षाही गरीब…” न्यासा देवगणचा Viral Video पाहून नेटकरी भडकले

न्यासा देवगणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

“ही तर त्यांच्यापेक्षाही गरीब…” न्यासा देवगणचा Viral Video पाहून नेटकरी भडकले
या व्हिडीओमुळे नेटकरी न्यासावर संतापले आहेत.

अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण चित्रपटांपासून दूर असली तरी स्टार किड असल्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते. सध्या ती शिक्षण पूर्ण करत आहे, पण सोशल मीडियावर तिच्या पार्टीच्या फोटोंची बरीच चर्चा असते. काही दिवसांपूर्वी ती परदेशात सुट्टी एन्जॉय करताना दिसली होती, त्यानंतर आता मुंबईत एका पार्टीमधून बाहेर पडून घरी जातानाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओवरून नेटकरी न्यासावर संतापले आहेत.

न्यासा देवगण श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर आणि इतर मित्रांसोबत डिनर करून रेस्टॉरंटमधून बाहेर पडत होती, तेव्हा काही गरीब मुलांनी तिच्याकडे मदतीची मागणी केली. त्यावर न्यासाने त्यांना दिलेल्या उत्तरामुळे सर्वच चकीत झाले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका होताना दिसत आहे.
आणखी वाचा- ‘ब्रह्मास्त्र’ करणार का ‘लाल सिंग चड्ढा’पेक्षा जास्त कमाई? एका दिवसात विकली गेली ‘इतकी’ तिकिटं

या व्हिडिओमध्ये न्यासा देवगण मित्रांसह डिनर पार्टी केल्यानंतर रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. तिच्या एका मैत्रिणीने तिचा हात धरला आहे आणि तिला सांभाळत गाडीच्या दिशेने जात आहे. मग काही मुली न्यासाला सांगतात, ‘दीदी काही मदत करा.’ हे ऐकून अजय देवगणची मुलगी न्यासा म्हणते, ‘माझ्याकडे पैसे नाहीत, नाहीतर मी दिले असते.’

आणखी वाचा- न्यासा बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार? अजय देवगण म्हणाला, “तिने काजोलला…”

न्यासा देवगणच्या तोंडून असे ऐकून युजर्सही चक्रावले आहेत. ते या व्हिडीओवर कमेंट करत न्यासावर टीका करत आहेत. एका युजरने लिहिलं, ‘अरे ही तर तुमच्यापेक्षा गरीब आहे, तुमच्याकडेच पैसे असतील तर तिला द्या.’ आणखी एका युजरने कमेंट केली, ‘दीदी सर्वात जास्त गरीब आहे’ तर आणखी एका युजरने न्यासाचा उत्तरावर संताप व्यक्त केला आहे. तो म्हणाला, ‘अरे आता तर अतिच झालं, हातात आयफोन १३ प्रो आहे आणि ही म्हणते पैसे नाही मग हा फोन कुठून आला.’

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajay devgn daugter nysa devgn viral video users angry comments on it mrj

ताज्या बातम्या