Ajay Devgn’s Special Post For Mother In Law : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा या बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. तनुजा यांचा आज (२३ सप्टेंबर) ८२ वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांचा जावई अभिनेता अजय दवगणने त्यांच्यासाठी पोस्ट केली आहे.
तनुजा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लेक अभिनेत्री काजोल व नात निसा देवगण यांनी सर्व कुटुंबीयांबरोबर एकत्र येत सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता अजय देवगणनेही त्याच्या सासुबाईंसाठी पोस्ट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजय देवगणची सासुबाईंसाठी खास पोस्ट
अजयने यावेळी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा मॉम, मी तुम्हाला काहीही दिलं तरी तुम्ही मला जी भेट दिली, त्यासमोर ते काहीच नाही. तुम्ही मला दिलेली भेट कायमच खूप खास असेल.” अजय दवगणने यावेळी काजोल व तनुजा यांचा एक फोटोसुद्धा शेअर केला आहे.
तनुजा यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्या दिवंगत दिग्दर्शक व निर्माते कुमारसेन समर्थ आणि ज्येष्ठ अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या कन्या आहेत. तनुजा यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचा वारसा होता. त्यांनी अनेक चित्रपटांत काम केलं आहे. तनुजा यांनी ‘जिने की राह’, ‘मेरे जीवन साथी’, ‘दो चार’, ‘अनुभव’, ‘हाथी मेरे साथी’, ‘ज्वेल थिफ’, ‘सन ऑफ सरदार’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. हिंदी सिनेमांबरोबर त्यांनी बंगाली चित्रपटांतही काम केलं आहे.
तनुजा यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मोठी मुलगी काजोलनेही अभिनयक्षेत्रात काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काजोल बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांच्या दोन्ही मुली काजोल व तनिशा अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत; तर त्यांचा जावई अजय देवगणही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.
Happy birthday mom…No matter what I give you, it can’t beat the best gift you have given me ❤️ pic.twitter.com/FcFBQYRnxu
— Ajay Devgn (@ajaydevgn) September 23, 2025
दरम्यान, अजय देवगण गेल्या काही दिवसांपासून ‘धमाल ४’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. याची निर्मिती त्याने स्वत: केली असून यामध्ये रितेश देशुमख, संजय मिश्रा, इशा गुप्ता, अर्शद वारसी, विजय पाटकर, जावेद जाफरी यांसारखे अनेक कलाकार झळकणार आहेत.