‘दृश्यम २’सारखा सुपरहीट चित्रपट दिल्याने अजय देवगण हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. हिंदी चित्रपट लागून फ्लॉप होत असताना अजय देवगणने हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक हीट करून दाखवल्याने सगळीकडेच त्याचं कौतुक होत आहे. नुकतंच त्याने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडमधील याच रिमेक कल्चरबद्दल वक्तव्य केलं आहे.

बॉलिवूडमधील कोणता चित्रपट सध्या रिमेक करण्यासारखा आहे असा प्रश्न अजयला विचारताच त्याने त्याच्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटाचं चटकन नाव घेतलं आहे. या चित्रपटातून अजय देवगणने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. हा चित्रपट यातील गाणी चांगलीच गाजली. अजयच्या कामाचीसुद्धा लोकांनी प्रशंसा केली. याच चित्रपटातील अजय देवगणच्या एन्ट्रीच्या सीनची जबरदस्त चर्चा झाली. या सीनमध्ये अजय दोन मोटरसायकलच्या मागे पाय ठेवून रुबाबदार एन्ट्री घेतो.

आणखी वाचा : “त्यांनी बऱ्याच गोष्टी लपवायचा…” सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा मुंबई पोलिसांवर आरोप

जर ‘फूल और कांटे’चा रिमेक झाला तर तीच आयकॉनीक पोज अजय देवगण पुन्हा साकारू शकतो का?असा प्रश्न या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. त्यावर अजय देवगण म्हणाला, “हो सराव केला नीट, तर महिन्या दोन महिन्यात नक्कीच मी असा स्टंट करू शकेन.” अजयने दिलेलं ही उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसला.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ अर्जुन कपूरने लाइक केला असून अजय देवगणला त्याने शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय अजयचे इतर चाहते हे उत्तर ऐकून ‘फूल और कांटे’चा लवकरात लवकर रिमेक बनवण्यासाठी मागे लागले आहेत. अजय देवगण सध्या ‘भोला’या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही अजय देवगण करणार आहे. अजय बरोबर या चित्रपटात तब्बूसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.