बॉलिवूडचा खिलाडी कुमार सध्या त्याच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं शूटिंग स्कॉटलँडमध्ये सुरू आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती अ‍ॅक्शन सीन्स शूट करत असताना अक्षयला दुखापत होऊन तो जखमी झाला होता. अपघातानंतर चित्रपटाचे चित्रीकरण काही काळासाठी थांबवण्यात आलं होतं. मात्र, अक्षय पुन्हा कामावर परतला आहे. पायाला गंभीर दुखापत होऊनही अक्षय चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. याबाबतचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

हेही वाचा- “मला तिने रात्री…” प्रसिद्ध अभिनेते, भाजपा खासदार रवी किशन यांचा कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटातील अक्षय कुमार टायगर श्रॉफ यांच्या एका अ‍ॅक्शन सीनचं शूटिंग सुरू होतं. याचदरम्यान स्टंट करताना अक्षय कुमारला दुखापत झाली. अक्षयच्या गुडघ्याला ही दुखापत झाली असून त्याच्यावर लगेचच उपचार करण्यात आले. स्कॉटलँडमधील चित्रपटाचं शूटिंग वेळेत पूर्ण करण्यासाठी अक्षयने दुखापत होऊनही शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्या सीन्सवर १५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे अक्षयने आराम न करता शुटिंग सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा- परिणीती चोप्राशी लग्न कधी करणार? या प्रश्नावर खासदार राघव चड्ढा लाजत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीडिया रिपोर्टनुसार, अक्षयने दुखापत झाल्यानंतरही शूटिंग बंद न करता चित्रपटातील पुढचे सीन्स चित्रीत केल्याची माहिती आहे. गंभीर दुखापत नसल्यामुळे अक्षयने शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. अक्षयच्या दुखापतीमुळे चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्सचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. सध्या खिलाडी कुमारचे चित्रपटातील अन्य सीन्स शूट करण्यात येत आहेत.