अभिनेता कमाल आर खान(केआरके) सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. ट्वीटद्वारे तो बॉलिवूड तसेच हिंदी चित्रपटांबाबत भाष्य करताना दिसतो. अनेकदा त्याच्या ट्वीटमुळे तो वादाच्या भोवऱ्यातही अडकला आहे. आता केआरकेने अभिनेता अक्षय कुमारबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अक्षय कुमारने मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली असल्याचा आरोप केआरकेने केला आहे.

केआरकेने नुकतेच एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये लिहिल आहे “अक्षय कुमार वगळतामाझे बॉलीवूडमधील सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. त्याने मला तुरुंगात मारण्याची सुपारी दिली होती. मला अटक केली होती. मी भाग्यवान होतो की मी तुरुंगातून बाहेर आलो. तो मला पुन्हा पोलीस ठाण्यात किंवा जेलमध्ये मारण्याची सुपारी देत आहेत. मला काही झाले तर त्याला अक्षय कुमार जबाबदार असेल. माझ्या मृत्यूशी शाहरुख खान, सलमान खान किंवा करण जोहरचा काहीही संबंध नाही.”

या पोस्टनंतर केआरकेला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. केआरकेने पुढच्या ट्विटमध्ये अक्षयचा अगामी चित्रपट ओह माय गॉड २’ बाबत मोठा दावा केला आहे. केआरकेने ट्वीटमध्ये लिहिलं आहे. ‘खिलाडी’चे १० चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप ठरले आहेत. इतकंच नाही तर त्याचा पुढचा ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपटही फ्लॉप ठरणार आहे. याआधी सलमान खानबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केआरके अडचणीत आला होता. त्याच्यावर कायदेशीर कारवाईही करण्यात आली होती.

हेही वाचा- लांब जटा, अंगाला भस्म अन् गळ्यात रुद्राक्षांची माळ; पोस्टरमधील ‘या’ अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘ओह माय गॉड २’ चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूक प्रदर्शित करण्यात आला. या लूकवरुन अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अक्षयबरोबर पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत.