अभिनेता अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने फ्लॉप होत आहे. अलीकडेच आलेला ‘सेल्फी’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. त्यानंतर अक्षयचे काही शोदेखील रद्द झाले होते. पण त्यातल्या त्यात त्याचे परदेशातील काही शो होत आहेत आणि त्यासाठी अक्षय नोरा फतेही, मौनी रॉय व दिशा पाटनीबरोबर गेला आहे. याच कार्यक्रमातील त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पत्नीशी वादांमुळे चर्चेत असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘या’ अभिनेत्रींबरोबर होते अफेअर; महिला वेटरसह वन नाइट स्टँड, आत्महत्येचा विचार अन्…

व्हायरल व्हिडीओमध्ये अक्षय कुमार नोरा फतेहीबरोबर डान्स करतोय, या व्हिडीओत अक्षयने घाघरा परिधान करून डान्स केला. त्याच्या या व्हिडीओवरून नेटकरी त्याला ट्रोल करत आहे. तुझे चित्रपट होत नाही, त्यामुळे पैसे कमवायला तुला आता घाघरा घालावा लागणार, असं नेटकरी म्हणत आहेत. काही जणांनी हसणारे इमोजी टाकून अक्षयच्या या लूकची खिल्ली उडवली आहे.

‘चित्रपटांमधून तुला पैसे मिळत नाहीयेत, त्यामुळे आता असे शो करून पैसे मिळव’, ‘हेच पाहायचं बाकी राहिलं होतं’. ‘अक्षय असले चाळे करणं बंद करत तरंच तुझे चित्रपट हिट होतील’, ‘म्हातारपणी काय काय करावं लागतं’, असा प्रकारच्या कमेंट्स अक्षयच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.