२०२३ मधील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पठाण’ हा नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. त्याचं कारण म्हणजे शाहरुख खान चार वर्षानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटाला शाहरुखचे चाहते चित्रपटगृहात तुफान प्रतिसाद देताना दिसत आहेत. शाहरुखच्या फॅन्सप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटींनाही या चित्रपटाने भुरळ घातली आहे.
‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून शाहरुखचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून हा चित्रपट आवडल्याचं त्याच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्याबरोबरच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील या चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर आता यात यादीमध्ये आलिया भट्टचाही समावेश झाला आहे. सोशल मीडियावरून तिने या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल टीमचं कौतुक केलं.
आलियाने आज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट करत या चित्रपटाबद्दलचं तिचं मत व्यक्त केलं. या स्टोरीमध्ये तिने या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिलं, “कारण विजय नेहमी प्रेमाचाच होतो…. व्हॉट अ ब्लास्ट!” हे लिहित तिने शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम आणि यशराज फिल्म्सला टॅग केलं. त्यामुळे पठाणला मिळणारा प्रतिसाद पाहून आलिया भट्ट देखील भारावून गेल्याचं दिसत आहे.

हेही वाचा : “शाहरुख हा धर्मनिरपेक्ष…” जावेद अख्तर यांनी किंग खानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत
या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होताना दिसत आहेत. तसंच हा वाढता प्रतिसाद बघून या चित्रपटाचे अनेक शो वाढवण्यात आले आहेत. तसंच प्रदर्शनाच्या दोन दिवसांतच या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे