बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आलिया भट्ट व रणबीर कपूर नुकतेच आई-बाबा झाले. ६ नोव्हेंबरला आलियाने तिच्या गोंडस मुलीला जन्म दिला. कन्येच्या आगमानाने कपूर कुटुंबियांतही आनंदाचे वातावरण आहे. बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच त्यांच्या मुलांनाही लहानपणापासूनच प्रसिद्धी मिळताना दिसते. तैमुर अली खान, जेह हे लोकप्रिय स्टारकिड्स आहेत. लहानपणापासूनच स्टारकिड्सला मिळणाऱ्या या लोकप्रियतेबाबत नुकत्याच आई झालेल्या आलियाने भाष्य केलं आहे.

आलिया भट्टने नुकतीच एका मासिकाला मुलाखत दिली आहे. ती म्हणाली, “मी, रणबीर कपूर, माझे मित्रमैत्रिणी व कुटुंबियांबाबतही या गोष्टींवर नेहमी बोलते. लोकप्रिय असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष सतत माझ्या मुलीवर असणार. त्यामुळे या सगळ्यात मुलीला मोठं करण्याची चिंता मला सतावत आहे. माझ्या मुलीच्या आयुष्यात कोणी डोकावलेलं मला आवडणार नाही. शिवाय आलियाची मुलगी आहे म्हणून माझ्या मुलीला प्रसिद्धी मिळालेलीही आवडणार नाही”.

हेही वाचा>> “माझ्याकडून घेतलेले पैसे त्याने…” प्रसिद्ध निर्मात्याचा सनी देओलवर फसवणुकीचा गंभीर आरोप

हेही वाचा>>आधी हाताने खेचलं, मग थेट दबंग स्टाइलने लाथ मारुन अमृता धोंगडेने तोडलं जेल; ‘बिग बॉस’ने सुनावली कठोर शिक्षा

आलिया या मुलाखतीत “तू व रणबीर दोघेही कलाकार आहात. तुमच्या मुलीनेही अभिनेत्री बनायचं ठरवलं तर?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत आलिया म्हणाली, “अशा गोष्टी माझ्या हातात नाहीत, त्यामुळे मी याचा विचारही करत नाही. सेलिब्रिटी किंवा अभिनेत्री व्हायचे की नाही हा सर्वस्वी माझ्या मुलीचा निर्णय असेल. तिने काय करावं याचं नियोजन मी करू शकत नाही. कारण, मी ठरवलेल्या गोष्टी पुढे तशा घडतीलच असं नाही. त्यामुळे निराशा येण्यापेक्षा मी या गोष्टींचा विचारच करत नाही”.

हेही पाहा>> Unseen Photos: ‘चंद्रा’ची पहिली लूक टेस्ट ते शूटिंगचा शेवटचा दिवस, अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकने शेअर केले खास फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया-रणबीरच्या मुलीचं लवकरच बारसंही होणार आहे. त्यांच्या मुलीच्या नावाचं ऋषी कपूर यांच्याशी खास कनेक्शन असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आलिया-रणबीरच्या मुलीच्या नावाबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे.