सेलिब्रिटी सासवा-सुनांचं नातं नेमकं कसं असतं हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. बॉलीवूडमधल्या अनेक सासू-सुना एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत. करीना कपूर – शर्मिला टागोर, कतरीना कैफ – विकी कौशलची आई, प्रियांका चोप्रा – डेनिस मिलर जोनस, दीपिका पदुकोण – अंजु भवनानी या सगळ्यांकडे बॉलीवूडमधल्या आदर्श सासू-सुना म्हणून पाहिलं जातं. या सगळ्या जोड्यांमध्ये आणखी एक नाव आघाडीवर आहे ते म्हणजे आलिया भट्ट व नीतू कपूर.

आलिया भट्ट व नीतू कपूर एकमेकींना कायम साथ देताना दिसतात. रणबीरशी लग्न होण्याआधीपासून या दोघींमध्ये खूप सुंदर असं नातं आहे. नीतू कपूर आलियाला सूनेपेक्षा जास्त आपली मुलगीच मानतात. त्यामुळे आज लाडक्या सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त आलियाने एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे आणि त्यावर दिलेल्या कॅप्शनमुळे आलियाचं तिच्या सासूबाईंवर किती प्रेम आहे आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : अंबानींच्या मोठ्या सुनेने २३ वर्षांनी रिक्रिएट केला करीना कपूरचा ‘बोले चुडिया’ लूक! श्लोकाला ‘त्या’ रुपात पाहून बेबो देखील भारावली

नीतू कपूर यांचा जन्म ८ जुलै १९५८ साली झाला. आज त्या आपला ६६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने त्यांच्या लाडक्या सुनेने खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सासूबाई अन् आई सोनी राजदान यांचा एकाच फ्रेममधील फोटो शेअर करत आलिया लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मॉम… तुम्ही माझा सगळ्यात मोठा आधारस्तंभ आहात. अगदी विविध फॅशन ट्रेंड फॉलो करण्यासाठी तुम्ही माझी मदत करता. माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे.”

हेही वाचा : Video: काका अयान मुखर्जीबरोबर गाडीतून फिरताना दिसली रणबीर-आलियाची लाडकी लेक, पुन्हा राहाच्या गोड अंदाजाने वेधलं लक्ष

आलियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये नीतू कपूर व अभिनेत्रीची आई सोनी राजदान एकत्र हातात दिवा धरून पोज देत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून भट्ट व कपूर कुटुंबीयांमध्ये किती सुंदर बॉण्डिंग आहे हे पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
alia bhatt post
आलिया भट्टची सासूबाईंसाठी खास पोस्ट

दरम्यान, अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर आलिया-रणबीरने २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. यानंतर अभिनेत्रीने नोव्हेंबर महिन्यात गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया-रणबीरच्या लेकीचं नाव राहा असं आहे. नीतू कपूर देखील अलीकडच्या प्रत्येक मुलाखतीत राहाबद्दल भरभरून बोलताना दिसतात.